Skip to content

Backsliders बद्दल बायबलमधील वचने

196 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले. ते सर्वजण तेच आध्यात्मिक पाणी प्याले. त्यांच्याबरोबर चाललेल्या आत्मिक खडकातून ते पाणी प्याले आणि हा खडक तर ख्रिस्त होते.

  2. And did all drink the same spiritual drink: for they drank of that spiritual Rock that followed them: and that Rock was Christ.

  3. हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली.

  4. आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या.

  5. त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”

  6. त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.

  7. आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.

  8. आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.

  9. आता या गोष्टी त्यांच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट येऊन ठेपला आहे, त्या आपल्याला इशारा म्हणून लिहून ठेवण्यात आल्या आहेत.

  10. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या.

  11. मनुष्यमात्रावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.

  12. कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल.

  13. होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.

  14. मला आश्चर्य वाटते की, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत जगण्यासाठी बोलाविले, त्यांना सोडून तुम्ही इतक्या लवकर वेगळ्या शुभवार्तेकडे वळत आहात,

  15. जी खरोखर शुभवार्ता नाहीच. काही लोक उघडपणे तुम्हाला गोंधळात टाकीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शुभवार्तेत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  16. पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता?

  17. तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता!

  18. तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.

  19. हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.

  20. कित्येक ती स्वीकारून विश्वासापासून ढळले आहेत. परमेश्वराची कृपा तुझ्याबरोबर असो.

  21. बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा.

  22. अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही.

  23. याबाबतीत आम्हाला खूप सांगावेसे वाटते, परंतु हे तुम्हाला स्पष्ट करून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.

  24. वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!

  25. ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले,