Skip to content

Backsliders बद्दल बायबलमधील वचने

196 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”

  2. तो आसाला भेटण्यासाठी गेला आणि त्याला म्हणाला, “आसा आणि सर्व यहूदाह व बिन्यामीन माझे ऐका, याहवेह तुमच्याबरोबर आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहाल. जर तुम्ही त्यांचा शोध घ्याल, तर ते तुम्हाला सापडतील, परंतु जर तुम्ही त्यांना सोडाल, तर ते तुम्हाला सोडतील.

  3. आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते.

  4. तरीपण संकटसमयी ते इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे वळले व त्यांनी त्यांचा शोध केला, तेव्हा त्यांनी त्यांची मदत केली.

  5. आणि सर्व लोक पाहू शकतील अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात,

  6. कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.

  7. जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो, किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते,

  8. तर परमेश्वराला ते समजले नसते काय? कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.

  9. “म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’

  10. जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील.

  11. माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही.

  12. “अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; माझी सर्व करुणा जागृत झाली आहे.

  13. काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो.

  14. काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात.

  15. पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात.

  16. काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात;

  17. परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही.

  18. “जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.

  19. पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो.

  20. “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.

  21. “एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो आणि ती त्याला सापडत नाही. त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’

  22. तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.

  23. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”

  24. बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये.

  25. मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला.