Skip to content

Backsliders बद्दल बायबलमधील वचने

196 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला,

  2. जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.

  3. जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

  4. परंतु जी भूमी काटे आणि कुसळे उपजविते, ती कुचकामी व शापित होण्याच्या बेतात आहे; तिचा अंत जळण्याने होईल.

  5. सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही,

  6. पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच.

  7. मोशेने दिलेले नियमशास्त्र एखाद्याने नाकारले तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.

  8. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?

  9. आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्‍यामध्ये मला संतोष वाटणार नाही.”

  10. माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.

  11. त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्‍या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवितात.

  12. त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते,

  13. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.

  14. नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते.

  15. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे.

  16. तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन.

  17. मी तिला वेळ दिला, पण आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याचे तिने नाकारले.

  18. पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्‍या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन.

  19. मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.

  20. जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.

  21. जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही.