Skip to content

Apostles बद्दल बायबलमधील वचने

90 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!”

  2. यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;

  3. आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”

  4. येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले.

  5. तेव्हा त्यांनी बारा जणांची निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे

  6. आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.

  7. त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले),

  8. जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता),

  9. आंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी

  10. आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला.

  11. त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला.

  12. त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका.

  13. जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका.

  14. ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा.

  15. एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”

  16. मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले.

  17. कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.

  18. परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का?

  19. तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का?

  20. ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.

  21. म्हणून त्यांनी ही गोष्ट आपसातच ठेवली आणि, “मरणातून पुन्हा उठणे” म्हणजे काय या गोष्टीविषयी ते चर्चा करू लागले.

  22. कारण ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. ते त्यांना म्हणाले, “मानवपुत्राला मनुष्यांच्या हाती धरून दिले जाईल. ते त्याला जिवे मारतील, पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”

  23. परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.

  24. लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.

  25. जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.