Skip to content

Apostles बद्दल बायबलमधील वचने: Selection of

21 वचने · 11 पैलू

Selection of बद्दल वचने

  1. येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते.

  2. येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”

  3. लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.

  4. किनार्‍यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहानला पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलाविले,

  5. आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.

  6. मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.

  7. नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते.

  8. त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही: शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान;

  9. फिलिप्प आणि बर्थलमय; थोमा आणि मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय;

  10. शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.

  11. येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले.

  12. तेव्हा त्यांनी बारा जणांची निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे

  13. आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.

  14. त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले),

  15. जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता),

  16. आंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी

  17. आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला.

  18. दिवस उगवताच त्यांनी आपल्या शिष्यांना स्वतःकडे बोलाविले आणि त्यांच्यापैकी बारा जणांना निवडले, ज्यांना त्यांनी प्रेषित पद प्रदान केले:

  19. शिमोन, ज्याला पेत्र असे नाव दिले, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,

  20. मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी,

  21. याकोबाचा पुत्र यहूदाह, आणि यहूदाह इस्कर्योत जो विश्वासघातकी झाला.