Philip
Philip चा उल्लेख असलेली वचने
फिलिप्प आणि बर्थलमय; थोमा आणि मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय;
आंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी
शिमोन, ज्याला पेत्र असे नाव दिले, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
दुसर्या दिवशी येशूंनी गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. त्यांना फिलिप्प सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.”
आंद्रिया आणि पेत्र यांच्याप्रमाणेच फिलिप्प बेथसैदा नगरचा रहिवासी होता.
मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.”
त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?” यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.”
तेव्हा नाथानाएलाने विचारले, “तुम्ही मला कसे ओळखता?” येशूंनी त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलविण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली उभे असताना पाहिले होते.”
जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?”
फिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक तरी लागेल!”
ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.”
तेव्हा फिलिप्पाने त्याबद्दल आंद्रियाला सांगितले; मग त्या दोघांनी येशूंना सांगितले.
फिलिप्प म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.”
येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’?
तिथे पोहोचल्यावर, ते राहत होते त्या माडीवरील खोलीत गेले. तिथे जे शिष्य उपस्थित होते ते हे: पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया; फिलिप्प आणि थोमा; बर्थलमय आणि मत्तय; अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी आणि याकोबाचा पुत्र यहूदाह.