मुख्य मजकुरावर जा

All Christians Should Be As Missionaries बद्दल बायबलमधील वचने

198 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की त्याने त्याचा भाऊ शिमोन याला शोधले आणि त्याला सांगितले, “आम्हाला मसिहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे.”

  2. मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला. येशूंनी त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा, म्हणजे खडक असे म्हणतील.” भाषांतर केल्यानंतर पेत्र.

  3. त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?” यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.”

  4. “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?”

  5. जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या.

  6. त्यावेळी सर्व विश्वासणारे एक हृदयाचे आणि एकमनाचे होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांची संपत्ती स्वतःची आहे असे हक्काने सांगत नव्हते, परंतु त्यांच्याकडे असलेले सर्वकाही त्यांनी समाईक मानले होते.

  7. प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाविषयी प्रेषित मोठ्या शक्तीने सतत साक्ष देत राहिले आणि त्या सर्वांवर परमेश्वराची विपुल कृपा शक्तीने कार्य करीत होती.

  8. त्यांच्यामध्ये गरजवंत असा कोणीही राहिला नव्हता. कारण घर व जमिनीचे जे मालक होते, ते त्यांची घरे व जमिनी विकून आलेले पैसे

  9. योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते,

  10. त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन विकून मिळालेली रक्कम प्रेषितांच्या चरणी आणून ठेवली.

  11. आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला.

  12. कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथकर येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते.

  13. स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले.

  14. तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली.

  15. प्रभूच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता.

  16. तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.

  17. मी केलेल्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला निदर्शनास आणून दिले आहे की, अशाप्रकारे श्रम करून आपण अशक्तांना साहाय्य करावे व प्रभू येशू जे शब्द स्वतः बोलले होते ते स्मरणात ठेवा: ‘घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.’ ”

  18. विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका.

  19. तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.

  20. आपण जे बळकट आहोत, ते आम्ही अशक्तांना भार वाहण्यास मदत केली पाहिजे, केवळ आपण स्वतःलाच संतुष्ट करू नये.

  21. आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्‍यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या.

  22. किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो.

  23. मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे.

  24. प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.

  25. त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत.