मुख्य मजकुरावर जा

All Christians Should Be As Missionaries बद्दल बायबलमधील वचने

198 वचने · 66 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.

  2. यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा.

  3. तुमच्या शिक्षणाची पद्धत मला समजू द्या, म्हणजे मी तुमच्या अद्भुत कृत्यांचे मनन करेन.

  4. तुमचे नियम मी राजांसमोर विदित करेन आणि मी लज्जित केला जाणार नाही.

  5. ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील.

  6. जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल.

  7. युवक व युवतींनो, वृद्ध व बालके.

  8. तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.

  9. धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते; परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल.

  10. उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्‍याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.

  11. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.

  12. सुज्ञ व्यक्तीचे मुख ज्ञान पसरवितात, पण मूर्खांचे ह्रदय सरळ नसते.

  13. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.

  14. तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात कर; पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल.

  15. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  16. अशक्त हात बळकट करा, निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;

  17. भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”

  18. जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.

  19. ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील.

  20. मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात.

  21. शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही.

  22. जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील.

  23. परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.”

  24. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.

  25. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.