मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय १५:३७सुमारे इ.स. ३२

    ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.

  2. मत्तय १५:३८सुमारे इ.स. ३२

    स्त्रिया व लेकरांशिवाय जे जेवले ते चार हजार पुरुष होते.

  3. मत्तय १५:३९सुमारे इ.स. ३२

    येशूंनी लोकांना घरी जाण्यास निरोप दिल्यानंतर ते एका होडीत बसून मगादान नावाच्या भागात आले.

  4. मत्तय १६:१सुमारे इ.स. ३२

    तिथे परूशी व सदूकी लोक येऊन येशूंना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता, ते म्हणाले, “आकाशातून आम्हास चिन्ह दाखवा.”

  5. मत्तय १६:२सुमारे इ.स. ३२

    तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “संध्याकाळ झाली, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस झाले आहे, म्हणजे हवामान अनुकूल होईल.’

  6. मत्तय १६:३सुमारे इ.स. ३२

    आणि सकाळी तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस आणि गडद आहे, म्हणजे वादळी हवा सुटेल,’ आकाशात होणार्‍या बदलांवरून त्याचा अर्थ तुम्हाला काढता येतो, परंतु काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही.

  7. मत्तय १६:४सुमारे इ.स. ३२

    दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” मग येशू तिथून निघून गेले.

  8. मत्तय १६:५सुमारे इ.स. ३२

    सरोवराच्या पलीकडे गेले आणि शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले.

  9. मत्तय १६:६सुमारे इ.स. ३२

    येशूने त्यांना म्हटले, “सांभाळा, परूशी व सदूकी लोकांच्या खमिरापासून सावध असा.”

  10. मत्तय १६:७सुमारे इ.स. ३२

    तेव्हा शिष्य आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपण भाकर आणली नाही म्हणून ते असे बोलत आहेत.”

  11. मत्तय १६:८सुमारे इ.स. ३२

    त्यांच्या चर्चेचा विषय ओळखून येशू म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भाकर नाही याबद्दल आपसात का बोलता?

  12. मत्तय १६:९सुमारे इ.स. ३२

    तुम्हाला अजून समजले नाही काय? पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले तेव्हा तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या ते तुम्हाला आठवत नाही काय?

  13. मत्तय १६:१०सुमारे इ.स. ३२

    किंवा सात भाकरींनी चार हजारांना जेवू घातले तेव्हा उरलेल्या अन्नाच्या तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या?

  14. मत्तय १६:११सुमारे इ.स. ३२

    तुम्हाला कसे समजत नाही की भाकरीविषयी मी बोलत नाही? परंतु परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असण्यास सांगत आहे.”

  15. मत्तय १६:१२सुमारे इ.स. ३२

    मग भाकरीमध्ये घालण्यात येणार्‍या खमिराबद्दल ते बोलत नसून परूशी व सदूकी यांच्या चुकीच्या शिक्षणाबद्दल ते बोलत होते हे त्यांच्या लक्षात आले.

  16. मत्तय १६:१३सुमारे इ.स. ३२

    येशू कैसरीया फ़िलिप्पी प्रांतात आले, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मानवपुत्र कोण आहे असे लोक म्हणतात?”

  17. मत्तय १६:१४सुमारे इ.स. ३२

    त्यांनी उत्तर दिले, “काहीजण म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह म्हणतात; आणि आणखी काही यिर्मयाह किंवा संदेष्ट्यापैकी एक.”

  18. मत्तय १६:१५सुमारे इ.स. ३२

    “परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?”

  19. मत्तय १६:१६सुमारे इ.स. ३२

    शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात.”

  20. मत्तय १६:१७सुमारे इ.स. ३२

    येशूंनी उत्तर दिले, “योनाहच्या पुत्रा शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे

  21. मत्तय १६:१८सुमारे इ.स. ३२

    आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारेन; तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचा विजय होणार नाही.

  22. मत्तय १६:१९सुमारे इ.स. ३२

    मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन; पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”

  23. मत्तय १६:२०सुमारे इ.स. ३२

    मग येशूंनी शिष्यांना ताकीद दिली, “मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.”

  24. मत्तय १६:२१सुमारे इ.स. ३२

    तेव्हापासून, येशू आपल्या शिष्यांना सांगू लागले की त्यांनी यरुशलेमास जाणे, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून अनेक दुःख सहन करणे, जिवे मारले जाणे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे हे अगत्य आहे.

  25. मत्तय १६:२२सुमारे इ.स. ३२

    पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला व म्हणाला, “प्रभूजी, असे तुम्हाला कधीच होणार नाही.”