circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय १५:१२सुमारे इ.स. ३२
थोड्या वेळाने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन विचारले, “आपल्या उद्गारांनी परूशी लोकांची मने दुखावली आहेत हे तुम्हाला कळले काय?”
- मत्तय १५:१३सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक झाड उपटून टाकण्यात येईल.
- मत्तय १५:१४सुमारे इ.स. ३२
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”
- मत्तय १५:१५सुमारे इ.स. ३२
पेत्र म्हणाला, “आम्हाला हा दाखला स्पष्ट करून सांगा.”
- मत्तय १५:१६सुमारे इ.स. ३२
“तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?” येशूंनी त्यांना विचारले.
- मत्तय १५:१७सुमारे इ.स. ३२
“तुम्हाला हे समजत नाही काय की, जे मुखात जाते ते पोटात उतरते आणि शरीरातून बाहेर पडते?
- मत्तय १५:१८सुमारे इ.स. ३२
परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात.
- मत्तय १५:१९सुमारे इ.स. ३२
कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात;
- मत्तय १५:२०सुमारे इ.स. ३२
आणि हेच मनुष्याला अशुद्ध करतात. परंतु हात धुतल्याशिवाय अन्न खाल्याने ते अशुद्ध होत नाहीत.”
- मत्तय १५:२१सुमारे इ.स. ३२
नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले.
- मत्तय १५:२२सुमारे इ.स. ३२
एक कनानी स्त्री त्या भागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझी मुलगी भूतग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.”
- मत्तय १५:२३सुमारे इ.स. ३२
पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभूजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.”
- मत्तय १५:२४सुमारे इ.स. ३२
तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.”
- मत्तय १५:२५सुमारे इ.स. ३२
परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”
- मत्तय १५:२६सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”
- मत्तय १५:२७सुमारे इ.स. ३२
“हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “स्वामीच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”
- मत्तय १५:२८सुमारे इ.स. ३२
ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याच क्षणी तिची मुलगी बरी झाली.
- मत्तय १५:२९सुमारे इ.स. ३२
नंतर येशूंनी ते ठिकाण सोडले आणि गालील सरोवराच्या किनार्याने गेले. मग ते एका डोंगरावर जाऊन बसले.
- मत्तय १५:३०सुमारे इ.स. ३२
खूप मोठी गर्दी त्यांच्याजवळ जमली. लोकांनी आपल्यातील लंगडे, आंधळे, मुके, अपंग आणि इतर रोगांनी आजारी असलेल्यांना त्यांच्या चरणांजवळ आणले आणि त्या सर्वांना त्यांनी बरे केले.
- मत्तय १५:३१सुमारे इ.स. ३२
मुके बोलू लागले, जे लंगडे होते ते चालू लागले आणि आंधळे पाहू लागले. सर्व जमाव आश्चर्यचकित होऊन इस्राएलाच्या परमेश्वराची मनःपूर्वक स्तुती करू लागला.
- मत्तय १५:३२सुमारे इ.स. ३२
येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो. कारण ते तीन दिवसापासून आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. त्यांना तसेच उपाशी पाठवून देण्याची माझी इच्छा नाही, तसे केले तर ते रस्त्यातच कोसळून पडतील.”
- मत्तय १५:३३सुमारे इ.स. ३२
शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”
- मत्तय १५:३४सुमारे इ.स. ३२
येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.”
- मत्तय १५:३५सुमारे इ.स. ३२
तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले.
- मत्तय १५:३६सुमारे इ.स. ३२
मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले आणि त्या मोडल्या व शिष्यांना दिल्या आणि त्यांनी ते लोकांना वाढले.