circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय १४:२३सुमारे इ.स. ३२
त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते.
- मत्तय १४:२४सुमारे इ.स. ३२
तेव्हा होडी किनार्यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.
- मत्तय १४:२५सुमारे इ.स. ३२
पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले.
- मत्तय १४:२६सुमारे इ.स. ३२
शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”
- मत्तय १४:२७सुमारे इ.स. ३२
पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
- मत्तय १४:२८सुमारे इ.स. ३२
मग पेत्र म्हणाला, “प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.”
- मत्तय १४:२९सुमारे इ.स. ३२
ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला.
- मत्तय १४:३०सुमारे इ.स. ३२
परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभूजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली.
- मत्तय १४:३१सुमारे इ.स. ३२
तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
- मत्तय १४:३२सुमारे इ.स. ३२
मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले.
- मत्तय १४:३३सुमारे इ.स. ३२
होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.”
- मत्तय १४:३४सुमारे इ.स. ३२
ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले.
- मत्तय १४:३५सुमारे इ.स. ३२
तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले.
- मत्तय १४:३६सुमारे इ.स. ३२
“तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
- मत्तय १५:१सुमारे इ.स. ३२
परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले,
- मत्तय १५:२सुमारे इ.स. ३२
“तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!”
- मत्तय १५:३सुमारे इ.स. ३२
येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता?
- मत्तय १५:४सुमारे इ.स. ३२
परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’
- मत्तय १५:५सुमारे इ.स. ३२
परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे.
- मत्तय १५:६सुमारे इ.स. ३२
अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.
- मत्तय १५:७सुमारे इ.स. ३२
अहो ढोंग्यांनो! यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो:
- मत्तय १५:८सुमारे इ.स. ३२
“ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
- मत्तय १५:९सुमारे इ.स. ३२
माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”
- मत्तय १५:१०सुमारे इ.स. ३२
येशूने गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “ऐका आणि समजून घ्या.
- मत्तय १५:११सुमारे इ.स. ३२
मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.”