circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय १३:५६सुमारे इ.स. ३१
याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?”
- मत्तय १३:५७सुमारे इ.स. ३१
आणि ते त्याच्यावर संतापले. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.”
- मत्तय १३:५८सुमारे इ.स. ३१
आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.
- मत्तय १४:१सुमारे इ.स. ३२
त्यावेळी प्रांताधिकारी हेरोदाने येशूंविषयी ऐकले,
- मत्तय १४:२सुमारे इ.स. ३२
तो आपल्या सेवकांना म्हणाला, “हा मेलेल्यातून जिवंत होऊन आलेला बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.”
- मत्तय १४:३सुमारे इ.स. ३२
आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते.
- मत्तय १४:४सुमारे इ.स. ३२
कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे नियमाने योग्य नाही.”
- मत्तय १४:५सुमारे इ.स. ३२
म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते.
- मत्तय १४:६सुमारे इ.स. ३२
हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.
- मत्तय १४:७सुमारे इ.स. ३२
त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.
- मत्तय १४:८सुमारे इ.स. ३२
तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.”
- मत्तय १४:९सुमारे इ.स. ३२
तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला,
- मत्तय १४:१०सुमारे इ.स. ३२
आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला.
- मत्तय १४:११सुमारे इ.स. ३२
त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले.
- मत्तय १४:१२सुमारे इ.स. ३२
योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.
- मत्तय १४:१३सुमारे इ.स. ३२
जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले.
- मत्तय १४:१४सुमारे इ.स. ३२
जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्यांना बरे केले.
- मत्तय १४:१५सुमारे इ.स. ३२
संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
- मत्तय १४:१६सुमारे इ.स. ३२
यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
- मत्तय १४:१७सुमारे इ.स. ३२
त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
- मत्तय १४:१८सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.”
- मत्तय १४:१९सुमारे इ.स. ३२
येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.
- मत्तय १४:२०सुमारे इ.स. ३२
ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या.
- मत्तय १४:२१सुमारे इ.स. ३२
जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.
- मत्तय १४:२२सुमारे इ.स. ३२
लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले.