मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित १२:१२सुमारे इ.स. ४४

    हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असेही म्हणतात त्याची आई मरीयाच्या घरी गेला. तिथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते.

  2. प्रेषित १२:१३सुमारे इ.स. ४४

    त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली.

  3. प्रेषित १२:१४सुमारे इ.स. ४४

    तिने पेत्राचा आवाज ओळखला, तेव्हा तिला एवढा आनंद झाला की दरवाजा न उघडता ती पुन्हा आत धावत गेली आणि, “पेत्र दारात आहे!” असे तिने सांगितले.

  4. प्रेषित १२:१५सुमारे इ.स. ४४

    ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत असावा.”

  5. प्रेषित १२:१६सुमारे इ.स. ४४

    परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

  6. प्रेषित १२:१७सुमारे इ.स. ४४

    पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभूने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्‍या स्थळी निघून गेला.

  7. प्रेषित १२:१८सुमारे इ.स. ४४

    पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली.

  8. प्रेषित १२:१९सुमारे इ.स. ४४

    हेरोदाने त्याचा पूर्ण शोध करूनही तो सापडला नाही, तेव्हा त्याने त्या सोळा पहारेकर्‍यांची उलट तपासणी करून त्यांना मरणदंडाच्या शिक्षेचा आदेश दिला. यानंतर हेरोद यहूदीयातून कैसरीयात गेला व तिथे राहिला.

  9. प्रेषित १२:२०सुमारे इ.स. ४४

    तो सोर व सीदोन येथील लोकांबरोबर भांडण करीत होता; ते आता एकत्र झाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर विशेष भेट ठरविली. राजाचा विश्वासू वैयक्तिक सेवक ब्लस्तचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांनी शांततेची मागणी केली, कारण ही शहरे त्यांच्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी हेरोद राजाच्या देशावर अवलंबून होती.

  10. प्रेषित १२:२१सुमारे इ.स. ४४

    नेमलेल्या दिवशी हेरोद, आपली राजवस्त्रे परिधान करून राजासनावर बसला आणि त्यांच्यापुढे जाहीर भाषण करू लागला.

  11. प्रेषित १२:२२सुमारे इ.स. ४४

    ते ओरडले, “ही मनुष्याची नव्हे परंतु परमेश्वराची वाणी आहे.”

  12. प्रेषित १२:२३सुमारे इ.स. ४४

    हेरोदाने परमेश्वराला गौरव दिले नाही, म्हणून प्रभूच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले व तो मरण पावला.

  13. प्रेषित १२:२४सुमारे इ.स. ४४

    परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि वाढत गेले.

  14. प्रेषित १२:२५सुमारे इ.स. ४४

    जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.

  15. प्रेषित १३:१सुमारे इ.स. ४५

    आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल.

  16. प्रेषित १३:२सुमारे इ.स. ४५

    हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.”

  17. प्रेषित १३:३सुमारे इ.स. ४५

    तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला.

  18. प्रेषित १३:४सुमारे इ.स. ४५

    पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.

  19. प्रेषित १३:५सुमारे इ.स. ४५

    सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.

  20. प्रेषित १३:६सुमारे इ.स. ४५

    त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला.

  21. प्रेषित १३:७सुमारे इ.स. ४५

    सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती.

  22. प्रेषित १३:८सुमारे इ.स. ४५

    परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला.

  23. प्रेषित १३:९सुमारे इ.स. ४५

    मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले,

  24. प्रेषित १३:१०सुमारे इ.स. ४५

    “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?

  25. प्रेषित १३:११सुमारे इ.स. ४५

    तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला.