मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित १३:३७सुमारे इ.स. ४५

    परंतु ज्याला परमेश्वराने मृतातून उठविले आणि त्याचे शरीर कुजले नाही.

  2. प्रेषित १३:३८सुमारे इ.स. ४५

    “यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे.

  3. प्रेषित १३:३९सुमारे इ.स. ४५

    जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते.

  4. प्रेषित १३:४०सुमारे इ.स. ४५

    यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये:

  5. प्रेषित १३:४१सुमारे इ.स. ४५

    “ ‘निंदा करणार्‍यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’”

  6. प्रेषित १३:४२सुमारे इ.स. ४५

    पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली.

  7. प्रेषित १३:४३सुमारे इ.स. ४५

    मग सभा संपल्यावर अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले व त्यांच्याबरोबर बोलणे केले. त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे असे पौल आणि बर्णबाने त्यांना उत्तेजन दिले.

  8. प्रेषित १३:४४सुमारे इ.स. ४५

    पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले.

  9. प्रेषित १३:४५सुमारे इ.स. ४५

    परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.

  10. प्रेषित १३:४६सुमारे इ.स. ४५

    मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरिता तुम्ही स्वतः योग्य नाहीत असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो.

  11. प्रेषित १३:४७सुमारे इ.स. ४५

    यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”

  12. प्रेषित १३:४८सुमारे इ.स. ४५

    गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभूच्या वचनाचा सन्मान केला व आणि ज्यांना सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त करण्यात आले होते त्या सर्वांनी विश्वास ठेवला.

  13. प्रेषित १३:४९सुमारे इ.स. ४५

    प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले.

  14. प्रेषित १३:५०सुमारे इ.स. ४५

    परंतु यहूदी पुढार्‍यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले.

  15. प्रेषित १३:५१सुमारे इ.स. ४५

    तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले.

  16. प्रेषित १३:५२सुमारे इ.स. ४५

    आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.

  17. प्रेषित १४:१सुमारे इ.स. ४६

    इकुन्या येथे पौल व बर्णबा नेहमीप्रमाणे यहूदी सभागृहामध्ये गेले. तिथे ते इतक्या प्रभावीपणाने बोलले की, यहूदी व गैरयहूदी लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला.

  18. प्रेषित १४:२सुमारे इ.स. ४६

    परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांनी इतर गैरयहूद्यांना चिथावणी देऊन बंधुवर्गाविरुद्ध त्यांची मने विषाने भरली.

  19. प्रेषित १४:३सुमारे इ.स. ४६

    तरी देखील पौल व बर्णबाने तिथे बराच काळ घालविला, ते धैर्याने प्रभूसाठी बोलत राहिले, त्यांनी कृपेचा संदेश चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे सिद्ध केला.

  20. प्रेषित १४:४सुमारे इ.स. ४६

    मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले.

  21. प्रेषित १४:५सुमारे इ.स. ४६

    त्यांना अन्यायाने धोंडमार करण्यासाठी गैरयहूदी, यहूदी, व त्यांचे पुढारी मिळून कट करीत होते.

  22. प्रेषित १४:६सुमारे इ.स. ४६

    हे त्यांना समजल्यावर ते लुकाओनियानच्या प्रांतातील लुस्त्र, दर्बे व सभोवतालच्या देशामध्ये पळून गेले,

  23. प्रेषित १४:७सुमारे इ.स. ४६

    आणि तिथे शुभवार्तेचा प्रचार करीत राहिले.

  24. प्रेषित १४:८सुमारे इ.स. ४६

    त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता.

  25. प्रेषित १४:९सुमारे इ.स. ४६

    पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले.