- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- दानीएल २:३सुमारे इ.स.पू. ६०३
तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.”
- दानीएल २:४सुमारे इ.स.पू. ६०३
त्या ज्योतिषांनी राजाला उत्तर दिले, “महाराज, चिरायू असा! आपले स्वप्न काय होते ते आपल्या सेवकांना सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
- दानीएल २:५सुमारे इ.स.पू. ६०३
त्यावर राजाने ज्योतिषांना उत्तर दिले, “मी हा दृढ निश्चय केले आहे: जर मला ते स्वप्न कोणते आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही सांगितले नाहीतर मी तुमचे तुकडे करेन आणि तुमच्या घरादारांचे उकिरडे केले जातील.
- दानीएल २:६सुमारे इ.स.पू. ६०३
पण माझे स्वप्न काय होते, त्याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही मला सांगितले, तर तुम्ही माझ्याकडून भेट व इनामे आणि मोठा सन्मान प्राप्त कराल. म्हणून मला माझे स्वप्न सांगा आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगा.”
- दानीएल २:७सुमारे इ.स.पू. ६०३
त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “महाराजांनी, स्वप्न आपल्या सेवकांना सांगावे आणि आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
- दानीएल २:८सुमारे इ.स.पू. ६०३
तेव्हा राजाने उत्तर दिले, मला आता खात्री झाली आहे की तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहात, कारण मी हा दृढ निश्चय केला आहे, हे तुम्हाला कळले आहे:
- दानीएल २:९सुमारे इ.स.पू. ६०३
जर तुम्ही मला माझे स्वप्न सांगणार नाही, तर तुम्हासाठी फक्त एकच शिक्षा आहे. परिस्थिती बदलेल या आशेने तुम्ही मला भ्रामक आणि दुष्ट गोष्टी सांगण्याचा कट रचला आहे. म्हणून तुम्ही मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा परिणाम सांगू शकता.
- दानीएल २:१०सुमारे इ.स.पू. ६०३
ज्योतिषी लोकांनी राजाला उत्तर दिले, “पृथ्वीवर असा कोणताही व्यक्ती नाही, जे राजाने सांगितले आहे ते करू शकेल! कोणत्याही राजाने मग तो कितीही महान आणि पराक्रमी असला तरी जादूगार किंवा तांत्रिक किंवा ज्योतिषी यांना असे विचारले नाही.
- दानीएल २:११सुमारे इ.स.पू. ६०३
महाराजाने जे विचारत आहेत ते अशक्य आहे. ज्या दैवतांचे राहणे मनुष्यात नाही, त्यांच्या खेरीज हे महाराजांना कोणीही प्रकट करू शकणार नाही.”
- दानीएल २:१२सुमारे इ.स.पू. ६०३
हे ऐकून राजाला क्रोध आला आणि तो संतप्त झाला आणि त्याने फर्मान काढले की बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांचा शिरच्छेद करा.
- दानीएल २:१३सुमारे इ.स.पू. ६०३
ज्ञानी लोकांना मारण्याचे फर्मान काढण्यात आले आणि दानीएल व त्याच्या मित्रांचा वध करण्यासाठी लोकांना पाठविण्यात आले.
- दानीएल २:१४सुमारे इ.स.पू. ६०३
जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला.
- दानीएल २:१५सुमारे इ.स.पू. ६०३
त्याने राजाच्या अधिकार्याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली.
- दानीएल २:१६सुमारे इ.स.पू. ६०३
ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल.
- दानीएल २:१७सुमारे इ.स.पू. ६०३
मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांना सांगितली.
- दानीएल २:१८सुमारे इ.स.पू. ६०३
दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये.
- दानीएल २:१९सुमारे इ.स.पू. ६०३
त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.
- दानीएल २:२०सुमारे इ.स.पू. ६०३
आणि दानीएल म्हणाला: “परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो; कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे.
- दानीएल २:२१सुमारे इ.स.पू. ६०३
ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात.
- दानीएल २:२२सुमारे इ.स.पू. ६०३
गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; अंधारात काय आहे हे ते जाणतात आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो.
- दानीएल २:२३सुमारे इ.स.पू. ६०३
हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.”
- दानीएल २:२४सुमारे इ.स.पू. ६०३
बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करण्याचे काम अर्योकवर सोपविले होते. दानीएल त्याला जाऊन भेटला व म्हणाला, “बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करू नका. मला राजाकडे घेऊन चला आणि मी राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेन.”
- दानीएल २:२५सुमारे इ.स.पू. ६०३
अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.”
- दानीएल २:२६सुमारे इ.स.पू. ६०३
राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”
- दानीएल २:२७सुमारे इ.स.पू. ६०३
दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही,