- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- दानीएल २:२८सुमारे इ.स.पू. ६०३
परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:
- दानीएल २:२९सुमारे इ.स.पू. ६०३
“महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे.
- दानीएल २:३०सुमारे इ.स.पू. ६०३
माझ्यासाठी, हे रहस्य मला उघड केले गेले कारण माझ्याकडे इतर जिवंत माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणून नाही, परंतु महाराजांना रहस्याचा अर्थ कळावा आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते समजावे.
- दानीएल २:३१सुमारे इ.स.पू. ६०३
“महाराज, तुम्ही पाहिले की तुमच्यापुढे एक प्रचंड पुतळा उभा आहे—एक प्रचंड, चकाकदार पुतळा, दिसण्यात अद्भुत.
- दानीएल २:३२सुमारे इ.स.पू. ६०३
त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या,
- दानीएल २:३३सुमारे इ.स.पू. ६०३
त्याचे पाय लोखंडाचे होते आणि पावले लोखंडाची व त्यात काही अंश मातीचा होता.
- दानीएल २:३४सुमारे इ.स.पू. ६०३
तुम्ही पहात असताना, एका खडकाने कोणताही मानवी स्पर्श न होता स्वतःला छेदले आणि त्या मूर्तीच्या लोखंडी आणि मातीच्या पायावर अशा प्रकारे आदळले की त्याचा चुराडा झाला.
- दानीएल २:३५सुमारे इ.स.पू. ६०३
मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.
- दानीएल २:३६सुमारे इ.स.पू. ६०३
“हे आपले स्वप्न आणि आता त्याचा अर्थ महाराजासाठी सांगतो.
- दानीएल २:३७सुमारे इ.स.पू. ६०३
महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे;
- दानीएल २:३८सुमारे इ.स.पू. ६०३
आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.
- दानीएल २:३९सुमारे इ.स.पू. ६०३
“तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.
- दानीएल २:४०सुमारे इ.स.पू. ६०३
शेवटी, एक चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत असेल—कारण लोखंड सर्व गोष्टींचे तुकडे करतो आणि चुराडा करतो—आणि लोखंड ज्याप्रमाणे गोष्टींचे तुकडे करेल, त्याचप्रमाणे हे राज्य त्याचे तुकडे करून चुराडा करेल.
- दानीएल २:४१सुमारे इ.स.पू. ६०३
जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले.
- दानीएल २:४२सुमारे इ.स.पू. ६०३
काही लोखंड व काही माती यांनी बनलेली पावले आणि बोटे आपल्याला दिसली म्हणजेच हे साम्राज्य काही मजबूत व काही दुबळी असतील.
- दानीएल २:४३सुमारे इ.स.पू. ६०३
आणि जसे तुम्ही लोखंडाला भाजलेल्या मातीत मिसळलेले पाहिले, तसे लोक मिसळले जातील, पण एकरूप होणार नाहीत, कारण लोखंड मातीत मिसळत नाही.
- दानीएल २:४४सुमारे इ.स.पू. ६०३
“त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.
- दानीएल २:४५सुमारे इ.स.पू. ६०३
हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता. “महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.”
- दानीएल २:४६सुमारे इ.स.पू. ६०३
मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलसमोर साष्टांग दंडवत घालत तो पालथा पडला आणि आज्ञा केली की त्याला अर्पणे व सुगंधी द्रव्ये सादर करावी.
- दानीएल २:४७सुमारे इ.स.पू. ६०३
राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”
- दानीएल २:४८सुमारे इ.स.पू. ६०३
मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.
- दानीएल २:४९सुमारे इ.स.पू. ६०३
मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला.
- दानीएल ३:१सुमारे इ.स.पू. ५८०
नबुखद्नेस्सर राजाने एक सुवर्ण पुतळा घडविला. त्याची उंची साठ हात आणि रुंदी सहा हात होती, आणि बाबेल प्रांतातील दूरा नावाच्या मैदानात हा पुतळा स्थापित केला.
- दानीएल ३:२सुमारे इ.स.पू. ५८०
मग नबुखद्नेस्सरने आपल्या साम्राज्यातील राजपुत्र, सर्व राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी या सर्वांना त्याने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी बोलाविले.
- दानीएल ३:३सुमारे इ.स.पू. ५८०
राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र झाले आणि त्या पुतळ्याच्या पुढे उभे राहिले.