मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.

  2. अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.

  3. पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.

  4. परंतु हिज्कीयाहचे मन गर्विष्ठ होते आणि त्याच्यावर दाखविलेल्या दयेला त्याने अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्यावर आणि यहूदीया व यरुशलेमवर याहवेहचा कोप आला होता.

  5. तेव्हा हिज्कीयाहने त्याच्या अंतःकरणातील गर्वाबद्दल पश्चात्ताप केला; तसेच यरुशलेमच्या लोकांनीसुद्धा केले; त्यामुळेच हिज्कीयाहच्या कार्यकालामध्ये याहवेहचा क्रोध त्यांच्यावर आला नाही.

  6. हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.

  7. वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले.

  8. त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्यासाठी याहवेहने म्हटले होते, “यरुशलेमात माझे नाव सर्वकाळासाठी राहील.”

  9. जी कोरीव मूर्ती त्याने घडविली होती, ती त्याने घेतली व परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी परमेश्वर, दावीद व त्याचा पुत्र शलोमोन यांना म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.

  10. परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.

  11. आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत.

  12. त्याने परकीय दैवते टाकून दिली आणि याहवेहच्या मंदिरातून मूर्ती काढून टाकली, तसेच मंदिराच्या टेकडीवर आणि यरुशलेममध्ये ज्या वेद्या त्याने बांधल्या होत्या त्या सर्व वेद्या काढल्या आणि त्या शहराबाहेर फेकून दिल्या.

  13. वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले.

  14. वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले.

  15. त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली.

  16. याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले.

  17. वेद्या आणि अशेराचे स्तंभ मोडून टाकले आणि मूर्तींचा चुरा करून पूड केली आणि संपूर्ण इस्राएलमधून सर्व धूपवेद्यांचे तुकडे केले. नंतर तो यरुशलेमकडे परत गेला.

  18. ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले.

  19. हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.

  20. नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले.

  21. यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि लेवी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले.

  22. नंतर त्याने यरुशलेममधील प्रत्येकाला आणि बिन्यामीन गोत्रांच्या लोकांना तसे वचन देण्यास लावले; यरुशलेमच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराबरोबर केलेल्या कराराप्रमाणे केले.

  23. योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले.

  24. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.

  25. तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला.