मुख्य मजकुरावर जा

Babylon

255 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Babylon's, Sheshach

32.5300, 44.4200 गूगल नकाशावर पाहा

Babylon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

  2. बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला.

  3. मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.

  4. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.

  5. नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले.

  6. बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले.

  7. रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.

  8. हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.

  9. यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले.

  10. तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले.

  11. यहोयाखीन जिवंत असेपर्यंत बाबेलचा राजा त्याला प्रती दिवस तो मरेपर्यंत नियमित पुरवठा देत असे.

  12. त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल.

  13. “बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले.

  14. “ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.

  15. त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो त्या पाशात पकडला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये आणेन आणि तिथे त्याच्यावर न्याय आणेन कारण तो माझ्याशी अविश्वासू राहिला.

  16. त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्‍यात टाकले आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले. त्याने त्याला तुरुंगात ठेवले, म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही.

  17. “मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव.

  18. कारण बाबेलचा राजा शकुन पाहण्यासाठी दुहेरी वाटेच्या मधोमध, त्या दोन वाटांच्या चौकात थांबेल: तो बाणांनी चिठ्ठ्या टाकेल, तो मूर्तींचा सल्ला घेईल आणि काळजाची परीक्षा करून शकुन पाहील.

  19. “हे मानवपुत्रा, ही तारीख, हा दिवस नोंदून ठेव, कारण आजच्याच दिवशी बाबेलच्या राजाने यरुशलेमला वेढा घातला.

  20. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन.

  21. “मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही.

  22. यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल.

  23. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हातून मी इजिप्तच्या टोळीचा अंत करेन.

  24. मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन पण फारोहचे हात मोडेन आणि तो बाबेलच्या राजासमोर मरणपंथास टेकलेल्या घायाळ मनुष्याप्रमाणे कण्हेल.

  25. मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन, परंतु फारोहचे हात लुळे पडतील. जेव्हा मी बाबेलच्या राजाच्या हाती माझी तलवार देईन आणि जेव्हा तो ती इजिप्तविरुद्ध चालवील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.