मुख्य मजकुरावर जा

Nebuzaradan

15 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Nebuzar-adan

"Nebuzaradan" साठी शोधा

Nebuzaradan चा उल्लेख असलेली वचने

  1. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.

  2. नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने शहराच्या विध्वंसातून वाचलेल्या आणि बाबेलच्या राजाला शरण गेलेल्या लोकांना बंदिवासात नेले.

  3. रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.

  4. मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला.

  5. परंतु सर्व यहूदाह प्रांतात त्याने अगदी गरीब असलेल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नव्हते त्यांना नबुजरदानने तिथेच राहू दिले व त्यांना शेते आणि द्राक्षमळे दिले.

  6. आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली:

  7. त्याप्रमाणे गारद्यांचा सरदार नबुजरदान, खोजांचा प्रमुख नबूशजबान व राजाचा सल्लागार नेरगल-शरेसर व बाबिलोनचे इतर उच्चाधिकारी यांनी

  8. पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याला, बाबिलोन येथे बंदिवासात यरुशलेम व यहूदीया येथील जे लोक पाठविले जाणार होते, त्यांच्याबरोबर यिर्मयाह साखळदंडात बांधलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला रामाह येथे नेले, त्याची सुटका केली. यानंतर यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.

  9. नथन्याहचा पुत्र इश्माएलने पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने मिस्पाहमध्ये अहीकामचा पुत्र गदल्याहच्या स्वाधीन केलेल्या लोकांना व राजकन्यांना आणि उरलेल्या सर्वांनाही ताब्यात घेतले. सर्व कैद्यांना त्याने बरोबर घेऊन तो पलीकडील अम्मोनी लोकांकडे चालू लागला.

  10. त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.

  11. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.

  12. नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले.

  13. परंतु नबुजरदानने देशातील जे लोक अत्यंत गरीब होते त्यांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.

  14. रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.

  15. नबुखद्नेस्सरच्या तेविसाव्या वर्षी, पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने 745 यहूदी लोक बाबेलला नेले.