Skip to content

Gedaliah

26 वचने · 1 कुटुंब सदस्य

Gedaliah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने शाफानचा पुत्र अहीकामचा पुत्र गदल्याहला, यहूदीयाहमध्ये उरलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त केले.

  2. जेव्हा सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने गदल्याहची राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कारेहचा पुत्र योहानान, नटोफाथी तन्हुमेथचा पुत्र सेरायाह आणि माकाथीचा पुत्र याजन्याह आणि त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.

  3. त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी गदल्याहने शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांना भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा आणि तुमचे बरे होईल.”

  4. परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले.

  5. सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.

  6. यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले.

  7. तेव्हा यिर्मयाह मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहकडे गेला व देशातील उरलेल्या लोकांमध्ये राहिला.

  8. अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे,

  9. तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.

  10. शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल.

  11. यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा

  12. तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.

  13. कारेहपुत्र योहानान व मोकळ्या रानातील सैनिकांचे प्रमुख मिस्पाह येथे गदल्याहकडे आले,

  14. व तो गदल्याहला सतर्क करून म्हणाला, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस, याने नथन्याहचा पुत्र इश्माएल, याला तुझा वध करण्यास पाठविले आहे, हे तुला माहीत नाही काय?” परंतु अहीकामचा पुत्र गदल्याहने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

  15. नंतर कारेहाचा पुत्र योहानानने मिस्पाह येथे गदल्याहशी गुप्तपणे चर्चा केली व त्याला म्हटले, “मी नथन्याहचा पुत्र इश्माएलचा वध करतो, कोणालाही कळणार नाही. त्याला तुमचा वध का करू द्यावा, जे यहूदी गोळा होऊन तुझ्याकडे परतले आहेत, त्यांची पांगापांग होऊन उरलेल्या यहूदीयाचा नाश का होऊ द्यावा?”

  16. परंतु अहीकामचा पुत्र गदल्याह कारेहाचा पुत्र योहानानला म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट तू करू नये! कारण तू इश्माएलबद्दल खोटे सांगत आहेस.”

  17. परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याह याचा पुत्र, इश्माएल, जो राजघराण्यातील व राजाच्या उच्चाधिकार्‍यांपैकी एक होता. हा आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहस भेटण्यासाठी आला. ते सर्व भोजन करीत असताना,

  18. नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले.

  19. नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली.

  20. गदल्याहाच्या खुनाच्या दुसर्‍या दिवशी, कोणालाही हे समजण्यापूर्वी,

  21. नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.”

  22. वध केलेल्या लोकांचे व गदल्याहचे प्रेत नथन्याहचा पुत्र इश्माएलने ज्या विहिरीत टाकले होते, ती भली मोठी विहीर, इस्राएलचा राजा बाशा, याच्यापासून आपले संरक्षण करण्याकरिता आसा राजाने बांधली होती. नथन्याहचा पुत्र इश्माएलने ती विहीर प्रेतांनी भरून टाकली.

  23. नथन्याहचा पुत्र इश्माएलने पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने मिस्पाहमध्ये अहीकामचा पुत्र गदल्याहच्या स्वाधीन केलेल्या लोकांना व राजकन्यांना आणि उरलेल्या सर्वांनाही ताब्यात घेतले. सर्व कैद्यांना त्याने बरोबर घेऊन तो पलीकडील अम्मोनी लोकांकडे चालू लागला.

  24. मग कारेहापुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी अहीकामचा पुत्र गदल्याहचा नथन्याहचा पुत्र इश्माएलने वध केल्यानंतर मिस्पाह इथे उरलेल्या लोकांना—सैनिक, स्त्रिया, मुले व गिबोन येथून सोडविलेले राजदरबारातील अधिकारी यांना घेऊन ते निघाले.

  25. त्यांना बाबिलोनच्या लोकांचे भय वाटू लागले व ते त्यांना चुकविण्याचा प्रयत्न करू लागले, कारण नथन्याहचा पुत्र इश्माएलने बाबिलोनच्या राजाने देशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या अहीकामचा पुत्र गदल्याहचा वध केला होता.