Skip to content

Nethaniah बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जेव्हा सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने गदल्याहची राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कारेहचा पुत्र योहानान, नटोफाथी तन्हुमेथचा पुत्र सेरायाह आणि माकाथीचा पुत्र याजन्याह आणि त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.

  2. परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले.

  3. आसाफच्या पुत्रा मधून: जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.

  4. पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  5. त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.

  6. तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला.

  7. तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.

  8. व तो गदल्याहला सतर्क करून म्हणाला, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस, याने नथन्याहचा पुत्र इश्माएल, याला तुझा वध करण्यास पाठविले आहे, हे तुला माहीत नाही काय?” परंतु अहीकामचा पुत्र गदल्याहने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

  9. नंतर कारेहाचा पुत्र योहानानने मिस्पाह येथे गदल्याहशी गुप्तपणे चर्चा केली व त्याला म्हटले, “मी नथन्याहचा पुत्र इश्माएलचा वध करतो, कोणालाही कळणार नाही. त्याला तुमचा वध का करू द्यावा, जे यहूदी गोळा होऊन तुझ्याकडे परतले आहेत, त्यांची पांगापांग होऊन उरलेल्या यहूदीयाचा नाश का होऊ द्यावा?”

  10. परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याह याचा पुत्र, इश्माएल, जो राजघराण्यातील व राजाच्या उच्चाधिकार्‍यांपैकी एक होता. हा आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहस भेटण्यासाठी आला. ते सर्व भोजन करीत असताना,

  11. नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले.

  12. नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.”

  13. मग ते सर्वजण शहराच्या आत आल्यावर, नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याची माणसे यांनी त्यांच्यापैकी दहा जणांना सोडून बाकी सर्वांना जिवे मारले व त्यांची प्रेते एका विहिरीत टाकली.

  14. वध केलेल्या लोकांचे व गदल्याहचे प्रेत नथन्याहचा पुत्र इश्माएलने ज्या विहिरीत टाकले होते, ती भली मोठी विहीर, इस्राएलचा राजा बाशा, याच्यापासून आपले संरक्षण करण्याकरिता आसा राजाने बांधली होती. नथन्याहचा पुत्र इश्माएलने ती विहीर प्रेतांनी भरून टाकली.

  15. नथन्याहचा पुत्र इश्माएलने पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने मिस्पाहमध्ये अहीकामचा पुत्र गदल्याहच्या स्वाधीन केलेल्या लोकांना व राजकन्यांना आणि उरलेल्या सर्वांनाही ताब्यात घेतले. सर्व कैद्यांना त्याने बरोबर घेऊन तो पलीकडील अम्मोनी लोकांकडे चालू लागला.

  16. परंतु कारेहपुत्र योहानान व इतर सर्व सेना प्रमुखांनी नथन्याहचा पुत्र इश्माएलने केलेल्या गुन्ह्याबद्दल ऐकले,

  17. तेव्हा त्यांनी आपले सर्व लोक गोळा केले आणि नथन्याहचा पुत्र इश्माएलशी युद्ध करण्यास ते निघाले. गिबोनजवळच्या महाकुंडापाशी त्यांनी त्याला गाठले.