मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या अशा लहानातील एकालाही अडखळण आणतो, तर त्यांच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून समुद्रात फेकून देणे हे त्यांच्यासाठी अधिक हिताचे ठरेल.

  2. “या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात.

  3. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे.

  4. आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल.

  5. “मी तुम्हाला खरोखर सांगतो, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.

  6. “मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल.

  7. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.”

  8. मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, “प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?”

  9. येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा!

  10. “तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’

  11. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

  12. आपले बोलणे संपविल्यावर येशू गालील प्रांत सोडून यार्देन नदीच्या पार यहूदीया प्रांतात आले.

  13. लोक मोठ्या संख्येने त्यांच्यामागे जात होते आणि त्यांनी त्यांना बरे केले.

  14. काही परूशी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तिथे आले. त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने प्रत्येक किंवा कोणत्याही कारणासाठी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”

  15. येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’

  16. “मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?”

  17. मी तुम्हाला सांगतो, व्यभिचाराच्या कारणाशिवाय जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”

  18. येशूंचे शिष्य त्यांना म्हणाले, “जर अशी परिस्थिती पती आणि पत्नीमध्ये असेल, तर मग लग्न न केलेले बरे.”

  19. येशू म्हणाले, “हे शिक्षण प्रत्येकाला स्वीकारता येईल असे नाही; पण ज्यांना तसे दान दिले आहे, त्यानांच ते स्वीकारता येईल.

  20. येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे व प्रार्थना करावी म्हणून लोक आपल्या लहान बालकांना येशूंकडे घेऊन आले. परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.

  21. येशू शिष्यांना म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे.”

  22. त्या ठिकाणाहून निघण्यापूर्वी येशूंनी त्यांच्यावर हात ठेवले.

  23. आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”

  24. तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्‍या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”

  25. “कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले. येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको,