मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी.

  2. विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.

  3. पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून,

  4. जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:

  5. परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे.

  6. ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल.

  7. त्यांना पाहिले नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता; ते दिसत नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि अवर्णनीय गौरवी आनंदाने उल्हासता,

  8. त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.

  9. म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा.

  10. परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा.

  11. परंतु निष्कलंक आणि निर्दोष कोकरा, जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली.

  12. त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे.

  13. परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.” आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता.

  14. कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.

  15. तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.

  16. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  17. आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, “जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”

  18. परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.

  19. यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे.

  20. “त्यांनी कधीही पाप केले नाही; आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.”

  21. जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.

  22. त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.”

  23. कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”

  24. आदरयुक्त, शुद्ध विवेकबुद्धीला अनुसरून राहा, म्हणजे ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वागणुकीविरुद्ध जे लोक द्वेषभावाने बोलतात, त्यांना निंदानालस्तीची लाज वाटेल.

  25. नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते.