मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही येशूंजवळ, जे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत आणि हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम वचन बोलणार्‍या, त्या शिंपडलेल्या रक्ताजवळ आला आहात.

  2. तुमच्याशी जे बोलत आहेत, त्यांच्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण जगातील संदेश देणार्‍याची आज्ञा न पाळल्यामुळे इस्राएली लोकांची शिक्षेपासून सुटका झाली नाही, मग स्वर्गातून ताकीद देणार्‍याचे आपण ऐकले नाही, तर आपण किती मोठ्या संकटात सापडू?

  3. ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाने पृथ्वी हलली, पण आता ते वचन देतात, “केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही पुन्हा हालविणार.”

  4. म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?”

  5. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत.

  6. लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले.

  7. तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या.

  8. तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.

  9. आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत,

  10. यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

  11. परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,

  12. अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये.

  13. जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.

  14. त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.

  15. प्रिय बंधू आणि भगिनींनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण पक्षपात करू नये.

  16. ज्यांनी म्हटले, “तू व्यभिचार करू नको,” तोच हे सुद्धा म्हणतो, “तू खून करू नको.” जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो.

  17. परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”

  18. प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.

  19. याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.”

  20. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  21. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्‍या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्‍या पावसाची धीराने वाट पाहतो.

  22. तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीरपणे उभे राहा, कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे.

  23. बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा न्याय होऊ नये म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. न्यायाधीश दारात उभा आहे.

  24. बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या.

  25. तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही इय्योबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभूने त्याला कसे आशीर्वादित केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेले आहेत.