मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली.

  2. आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.

  3. परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत.

  4. आणि त्या वेळेपासून त्यांचे शत्रू त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत.

  5. कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे.

  6. याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले:

  7. “मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा, प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर, मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”

  8. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते.

  9. आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे.

  10. आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत,

  11. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.

  12. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?

  13. कारण “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे.

  14. कारण, “अगदी थोड्या वेळात, जो येणार आहे तो येईल आणि उशीर करणार नाही.”

  15. आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्‍यामध्ये मला संतोष वाटणार नाही.”

  16. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.

  17. विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करतीलच हे तिला माहीत होते.

  18. इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता.

  19. विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले.

  20. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.

  21. ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही.

  22. आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले, “माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस, त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,

  23. कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात, आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.”

  24. त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे.

  25. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही.