मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत.

  2. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.

  3. माझी इच्छा आहे की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि आमचे प्रभू आणि तारणाऱ्याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची तुम्ही आठवण ठेवावी.

  4. ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”

  5. प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.

  6. कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.

  7. परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.

  8. परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.

  9. तर मग प्रिय मित्रांनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्यांच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्यांच्याबरोबर शांतीत असलेले त्यांना आढळून यावे म्हणून प्रत्येक प्रकारे प्रयत्न करा.

  10. आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा.

  11. परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन.

  12. जे प्रारंभीपासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिले आहे, ज्याच्याकडे आम्ही लक्षपूर्वक पाहिले आहे आणि आमच्या हातांनी स्पर्श केला आहे; जीवनाच्या वचनासंबंधी आम्ही ही घोषणा करीत आहोत.

  13. आम्ही जे पाहिले व ऐकले आहे तेच तुम्हाला सांगत आहोत, यासाठी की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सहभागी व्हावे. आमची सहभागिता पित्याबरोबर आणि त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे.

  14. हा संदेश आम्ही त्यांच्याकडून ऐकला आहे आणि तो तुम्हाला घोषित करतो, परमेश्वर प्रकाश आहेत; त्यांच्यामध्ये अजिबात अंधार नाही.

  15. जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही.

  16. परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते.

  17. जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.

  18. माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हासाठी हे लिहित आहे यासाठी की तुम्ही पाप करू नये, परंतु जर कोणी पाप करतो, तर आपल्यासाठी एक कैवारी येशू ख्रिस्त, जे नीतिमान आहेत आणि ते पित्याजवळ आहेत.

  19. तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.

  20. आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे.

  21. जो कोणी असे म्हणतो, “मी त्यांना ओळखतो,” परंतु त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नाही तर तो लबाड आहे आणि सत्य त्या व्यक्तीमध्ये नाही.

  22. परंतु जर कोणी त्यांचे वचन पाळतो, तर परमेश्वरासाठी त्याची प्रीती खरोखर त्यांच्यामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून आपणास समजते की आपण त्यांच्यामध्ये आहोत.

  23. जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो, त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे.

  24. तरी मी तुम्हास एक नवी आज्ञा लिहित आहे; तिचे सत्य त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दिसून येत आहे, कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आताच प्रज्वलित झाला आहे.

  25. माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे, कारण येशूंच्या नावामुळे तुमच्या पातकांची क्षमा झाली आहे.