मुख्य मजकुरावर जा

Holy Spirit

251 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Spirit

Holy Spirit चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  2. परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल.

  3. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.

  4. यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.

  5. जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.

  6. नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:

  7. यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.

  8. कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.

  9. पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले,

  10. योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु जे माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत ते येतील, त्यांचा गुलाम होऊन त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडण्याचीही माझी योग्यता नाही. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.

  11. आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”

  12. पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले,

  13. यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली.

  14. “परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.

  15. तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!”

  16. आणि प्रत्येकजण जो मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही.

  17. कारण तुम्ही तिथे उभे असताना, काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल.”

  18. मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला.

  19. मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरतांना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’

  20. येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही.

  21. शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो.

  22. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”

  23. ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात.

  24. परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”

  25. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.