मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.

  2. हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, तरच आमचे तारण होईल.

  3. संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित. आसाफाची रचना. परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!

  4. इस्राएलसाठी हे विधी आहेत, हे याकोबाच्या परमेश्वराचे नियम आहेत.

  5. जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी योसेफाला हे नियम नेमून दिले. मी एक अज्ञात वाणी ऐकली व ती म्हणाली:

  6. “आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे; मी त्यांचे हात भार्‍याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत.

  7. तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला

  8. माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन— हे इस्राएला, तू केवळ माझे ऐकशील तर किती बरे होईल!

  9. मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले. तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”

  10. परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही; इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.

  11. म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले, ते स्वतःची इच्छापूर्ती करत राहिले.

  12. “परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते, जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर,

  13. मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता, आणि त्याच्या विरोधकांवर माझ्या हाताचा प्रहार केला असता!

  14. जे याहवेहचा तिरस्कार करतात, ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती.

  15. मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते; तुला डोंगरातील उत्कृष्ट मधाने मी तुला तृप्त केले असते.”

  16. आसाफाचे एक स्तोत्र. परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:

  17. “मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’

  18. हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.

  19. एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका; आमच्यासाठी कान बहिरे करू नका, असे अलिप्त राहू नका.

  20. पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात, तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे.

  21. तुमच्या लोकांविरुद्ध ते कट करतात; तुमच्या प्रिय लोकांविरुद्ध ते कारस्थान करीत आहेत.

  22. एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला; ते सर्व तुमच्याविरुद्ध संघटित झाले आहेत—

  23. ते म्हणाले होते, “चला परमेश्वराची कुरणे आपण हस्तगत करू या.”

  24. हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्‍याने उडणार्‍या भुशागत त्यांना करा.

  25. आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा, व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा.