मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे; तुमच्यावर भरवसा ठेवणार्‍या सेवकाला वाचवा, तुम्ही माझे परमेश्वर आहात;

  2. हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, कारण मी दिवसभर तुमचा धावा करतो.

  3. हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या, कारण मी केवळ तुमच्यावरच श्रद्धा ठेवली आहे.

  4. हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.

  5. याहवेह, माझी प्रार्थना ऐका; तुमच्या कृपेसाठी केलेला माझा धावा ऐका.

  6. मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन, कारण तुम्ही मला उत्तर देता.

  7. हे प्रभू, सर्व दैवतांमध्ये तुमच्यासारखा परमेश्वर कुठेही नाही; तुमची महत्कृत्ये अतुलनीय आहेत.

  8. हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे, तुमच्यासमोर सन्मानाप्रत येतील व तुमची आराधना करतील; तुमच्या पवित्र नामाची थोरवी गातील.

  9. कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता; तुम्हीच एकटे परमेश्वर आहात.

  10. हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा, म्हणजे तुमच्या विश्वासूपणावर मी भरवसा ठेवेन; मला एकचित्त हृदय प्रदान करा, म्हणजे मी तुमच्या नावाचे भय बाळगेन.

  11. माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन; मी तुमच्या नामाला सदासर्वकाळ गौरव देईन.

  12. कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता; अधोलोकाच्या तळापासून तुम्ही माझे प्राण सोडविले आहेत.

  13. हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात; निर्दयी लोकांची टोळी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे— त्यांना तुमची काहीही कदर नाही.

  14. परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.

  15. माझ्याकडे वळून मजवर दया करा; आपल्या सेवकाच्या वतीने आपले सामर्थ्य दाखवून द्या; माझे तारण करा, कारण माझ्या आईप्रमाणेच मी देखील तुमची सेवा करतो.

  16. तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या, म्हणजे माझे शत्रू ते पाहतील व लज्जित होतील, कारण हे याहवेह, तुम्ही मला साहाय्य केले आणि माझे समाधान केले.

  17. याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.

  18. परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला

  19. “मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”

  20. खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”

  21. नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील: “याचा जन्म सीयोनात झाला आहे.” सेला

  22. एक गीत. कोरहाच्या पुत्रांची स्तोत्र रचना. संगीत निर्देशकाकरिता. माहालाथ लान्‍नोथ चालीवर आधारित. एज्रावंशी हेमानचा मासकील हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे;

  23. माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो; माझ्या आरोळीकडे कान द्या.

  24. मृतांमध्ये मला असे टाकण्यात आले आहे, जसे वधलेल्यास कबरेत ठेवतात, आणि ज्यांचे तुम्हाला विस्मरण झाले आहे, ज्यांना तुमच्या आश्रयापासून दूर करण्यात आले आहे.

  25. तुमच्या क्रोधाचा भार मला फारच जड झाला आहे; तुमच्या क्रोधाच्या लाटांनी मला पीडले आहे. सेला