मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.

  2. त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.

  3. संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!

  4. याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.

  5. हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे.

  6. जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला

  7. ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.

  8. सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.

  9. याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला

  10. हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका; आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.

  11. तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.

  12. कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.

  13. सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात, ते कितीतरी धन्य होत.

  14. संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.

  15. तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला

  16. म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे, तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.

  17. हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा. आमच्याविरुद्ध तुमचा क्रोध पुन्हा भडकू देऊ नका.

  18. तुम्ही आमच्यावर सतत कोपलेले राहणार आहात काय? पिढ्यान् पिढ्यांवर तुमचा राग टिकून राहणार आहे काय?

  19. तुमचे लोक तुमच्या ठायी हर्षित व्हावे, म्हणून तुम्ही आम्हाला पुनरुज्जीवित करणार नाही काय?

  20. हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा आणि तुमचे तारण आम्हाला प्रदान करा.

  21. परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार; कारण त्यांनी आपल्या लोकांना व आपल्या भक्तांना शांतीचे अभिवचन दिले आहे. परंतु आपल्या लोकांनी मूर्खपणा करण्याचे थांबवावे.

  22. याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.

  23. याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत, आणि आमची भूमी मुबलक पीक देणार आहे.

  24. नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल आणि प्रभूच्या पावलांसाठी मार्ग सिद्ध करेल.

  25. दावीदाची एक प्रार्थना हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या, कारण मी दीन व दरिद्री आहे.