मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर त्यांनी यहूदाहचे गोत्र निवडले, त्यांना प्रिय असलेल्या सीयोन पर्वतास

  2. त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले, आणि पृथ्वीसारखे त्यांनी कायमचे निश्चित केले.

  3. त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.

  4. मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली.

  5. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.

  6. तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत, ते पक्ष्यांचे भक्ष्य झाले आहेत, तुमच्या भक्तांचे मास वन्यपशूंचा आहार झाला आहे.

  7. हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय? तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?

  8. अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.

  9. आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका; तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या, कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

  10. हे आमच्या उद्धारक परमेश्वरा, तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा; तुमच्या नामाकरिता आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.

  11. इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.

  12. बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.

  13. हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.

  14. मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले, सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू; एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत, आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.

  15. संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र. इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.

  16. एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या; या व आमचे तारण करा.

  17. हे परमेश्वरा, आम्हाला पूर्वस्थितीत आणा; आमचे तारण होण्यासाठी, तुमचे मुख आमच्यावर प्रकाशित करा.

  18. हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध, कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार?

  19. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, म्हणजे आमचे तारण होईल.

  20. तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.

  21. तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले, म्हणजे येणारे जाणारे सर्वजण त्याचे द्राक्ष तोडतील?

  22. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या! स्वर्गातून खाली दृष्टी लावा! या द्राक्षवेलीची काळजी घ्या.

  23. तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या.

  24. कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे; तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात.

  25. जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या, स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या.