मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले आणि घोर भीतीने त्यांची वर्षे व्यापून टाकली.

  2. जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले; ते मनापासून पुन्हा त्यांच्याकडे वळले.

  3. परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत आपली सुटका करणारे देवाधिदेव आहेत याची त्यांना आठवण झाली;

  4. परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत; त्यांच्या जिभेने ते त्यांच्याशी लबाड बोलत;

  5. त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती; त्यांच्याशी केलेल्या कराराशी ते विश्वासू राहिले नाहीत.

  6. तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले; त्यांच्या पापांची त्यांनी क्षमा केली आणि त्या सर्वांचाच नाश केला नाही; वारंवार त्यांनी आपला क्रोध आवरला आणि तो पराकोटीला जाऊ दिला नाही.

  7. कारण ते केवळ वार्‍याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे मर्त्य मानव आहेत, याचे त्यांना स्मरण झाले.

  8. त्यांनी कितीदा तरी त्यांच्याविरुद्ध बंड केले आणि अरण्यात त्यांना दुःख दिले!

  9. पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली; इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला त्यांनी चिथविले.

  10. पीडा देणार्‍यापासून त्यांनी केलेली त्यांची सुटका— त्यांच्या सामर्थ्याचे त्यांनी स्मरण केले नाही,

  11. ज्या दिवशी त्यांनी इजिप्तमध्ये आपली चिन्हे प्रदर्शित केली, सोअनाच्या प्रदेशात त्यांनी चमत्कार केले.

  12. त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला.

  13. त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.

  14. पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून, त्यांना वाट दाखवित मेंढरांसारखे रानातून नेले,

  15. त्यांनीच त्यांचे सुरक्षित मार्गदर्शन केले, म्हणून ते भयभीत झाले नाहीत; परंतु त्यांच्या शत्रूंना मात्र समुद्रात बुडवून टाकले.

  16. त्यांनी आपल्या उजव्या हाताने त्यांना आपल्या पवित्र भूमीच्या सीमेवरील पर्वतीय देशात आणले.

  17. तरी त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि त्यांनी सर्वोच्च परमेश्वराविरुद्ध बंड केले; त्यांच्या आज्ञा पाळण्याचे नाकारले.

  18. त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले.

  19. त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले.

  20. त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला,

  21. त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले.

  22. त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता.

  23. झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा, तसे प्रभू जागे झाले; द्राक्षरसाच्या धुंदीमधून जागे झालेल्या योध्यासारखे ते उठले.

  24. त्यांनी आपल्या शत्रूंची दाणादाण केली आणि त्यांची कायमची फजिती केली.

  25. परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला; एफ्राईमचे गोत्र पसंत केले नाही.