God
God चा उल्लेख असलेली वचने
कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.
मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन; मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत; इस्राएलमध्ये त्यांचे नाव थोर आहे.
त्यांचा मंडप शालेम येथे आहे, त्यांचे निवासस्थान सीयोन येथे आहे.
तिथे त्यांनी चमकणारे बाण, ढाली आणि तलवारी, युद्धाची शस्त्रे मोडली. सेला
हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.
तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो?
पृथ्वीवरील पीडितांचे रक्षण करण्यासाठी, परमेश्वर उठून उभे राहिले तेव्हा असे झाले. सेला
खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले.
तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी.
कारण ते अधिपतींचा अभिमान नष्ट करतील; पृथ्वीवरील राजांकरिता ते भयावह आहेत.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.
माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.
परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो; मी मनन करताना माझा आत्मा क्षीण झाला आहे. सेला
“प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय? ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय?
त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय? त्यांनी दिलेले अभिवचन पिढ्यान् पिढ्या निष्फळ राहणार काय?
परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय? क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” सेला
मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे: की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे.
मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन; पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन.
मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.”
हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत. आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?
चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात; तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता.
जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत, त्यांना तुम्ही आपल्या भुजांनी मुक्त केले आहे. सेला
परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले, जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले! त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला.
मेघांनी मुसळधार पाऊस पाडला; मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले; तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले.