मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता.

  2. परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.

  3. आसाफाचे मासकील हे परमेश्वरा, तुम्ही आम्हाला कायमचे टाकून दिले आहे का? स्वतःच्या कुरणातील कळपावर तुमचा क्रोधाग्नी एवढा का भडकला आहे?

  4. जे राष्ट्र प्राचीन काळी मोलाने विकत घेतले, ज्यांना आपले वारस होण्याकरिता तुम्ही खंडणी भरून सोडविले— सीयोन पर्वत जे तुमचे वसतिस्थान, त्यांचे स्मरण करा.

  5. या नगरीचा जो भयानक विध्वंस झाला आहे, त्यात तुम्ही चालत जा, शत्रूंनी पवित्रस्थानाची काय दुर्दशा केली आहे ती पाहा.

  6. तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या, आणि त्यांनी प्रमाण स्वरूप आपले ध्वज उभारले आहेत.

  7. त्यांनी तुमच्या मंदिराला आग लावून ते जमीनदोस्त केले; त्यांनी तुमच्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट केले.

  8. ते त्यांच्या मनात म्हणाले, “आम्ही अस्तित्वाचा मागमूसही आम्ही पुसून टाकू!” देशात परमेश्वराची उपासना होत असलेली सर्व सभास्थाने त्यांनी जाळून टाकली.

  9. हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार? तुमच्या नावाची निंदा शत्रू सर्वकाळ करणार काय?

  10. तुम्ही आपला हात, आपला उजवा हात का आवरून धरला आहे? आपल्या वस्त्रांमध्ये लपलेला हात बाहेर काढा आणि तुमच्या शत्रूचा संहार करा!

  11. परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात; पृथ्वीवर तारणाचे कार्य करणारे तुम्हीच आहात.

  12. तुम्हीच आपल्या शक्तीने समुद्र दुभागले; तुम्हीच जलाशयातील प्रचंड प्राण्यांची मस्तके फोडली.

  13. तुम्हीच झरे उफाळून जलप्रवाह बाहेर आणले; तुम्हीच सतत वाहणार्‍या नदीचे पाणी आटवून दिले.

  14. दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे; सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.

  15. पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.

  16. याहवेह, पाहा हे शत्रू तुमची कशी थट्टा करीत आहेत; उन्मत्त राष्ट्राने तुमच्या नावाची कशी निंदा केली आहे, याचे स्मरण करा.

  17. आपल्या कबुतराचे जीवन हिंसक श्वापदाच्या हाती देऊ नका; आपल्या पीडित प्रजेचे जीवन कायमचे विसरू नका.

  18. पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका; दरिद्री आणि दुःखी तुमच्या नावाची स्तुती करोत.

  19. परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा; मूर्ख तुमची दिवसभर अवहेलना करीत असतात, याची आठवण ठेवा.

  20. तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या शत्रूंचा कोलाहल क्षणोक्षणी वाढतच आहे.

  21. संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.

  22. तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो; मी सर्वांना रास्त न्याय देतो.

  23. पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले, तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला

  24. मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’ आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका.

  25. मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्‍यास उंच करतात.