मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण ज्याला तुम्ही शासन केले, त्याचाच ते छळ करतात, आणि ज्याला तुम्ही घायाळ केले, त्यांच्या वेदनेबद्दल ते बोलतात.

  2. त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा आणि तुमच्या तारणाचा वाटा त्यांना देऊ नका.

  3. मी दुःखित आणि पीडित आहे— परमेश्वर तुमचे तारणच माझी सुरक्षा आहे.

  4. मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.

  5. यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या गोर्‍ह्याच्या यज्ञार्पणापेक्षा, अधिक आनंद होईल.

  6. दीनजन हे पाहतील आणि ते हर्षभरित होतील— तुम्ही जे परमेश्वराचा शोध करतात, त्यांच्या हृदयात नवजीवन येवो.

  7. याहवेह गरजूंचे ऐकतात आणि ते आपल्या बंदिवानांचा अव्हेर करीत नाही.

  8. हे आकाशा, अगे पृथ्वी, हे समुद्रा, अहो समुद्रात संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांनो, त्यांचे स्तवन करा,

  9. कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील यहूदाह प्रांतातील शहरे ते पुन्हा स्थापित करतील. त्यांचे लोक तिथे वस्ती करतील आणि तेथील अधिकार घेतील;

  10. त्यांच्या सेवकांच्या मुलांनाही हा देश वतन म्हणून मिळेल, त्यांच्या नावावर प्रीती करणारे सर्वजण तिथे वसती करतील.

  11. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका. हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.

  12. परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”

  13. परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका.

  14. याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे; मला लज्जित होऊ देऊ नका.

  15. तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा; तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा आणि माझे तारण करा.

  16. मी सदैव जाऊ शकेन असे माझे आश्रयाचे खडक तुम्ही व्हा; तुम्ही माझ्या तारणाची आज्ञा द्या, कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात.

  17. परमेश्वरा, मला दुष्ट लोकांच्या पंजातून सोडवा, अन्यायी आणि क्रूर लोकांच्या तावडीतून मला मुक्त करा.

  18. प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.

  19. जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे; तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले. मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन.

  20. अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे; तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात.

  21. माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते, दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.

  22. ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे; त्याचा पाठलाग करून त्याला धरा, कारण त्याला कोणीही सोडविणारा नाही.”

  23. परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका, माझ्या परमेश्वरा, लवकर येऊन माझे साहाय्य करा.

  24. परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार; मी तुमची अधिकाधिक स्तुती करेन.

  25. जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या— आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल.