मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु परमेश्वराने ते ऐकले, त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे.

  2. परमेश्वराचा धन्यवाद असो, त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही, आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो आणि त्यांचा मुखप्रकाश आम्हावर पडो; सेला

  4. यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे, तुम्ही सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना कळावे.

  5. हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.

  6. राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला

  7. हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.

  8. कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे; परमेश्वर, आमचे परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देतात.

  9. परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.

  10. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वराने उठावे आणि त्यांच्या सर्व शत्रूंची दाणादाण होवो; त्यांचे वैरी त्याच्यापुढून पळून जावोत.

  11. तुम्ही त्यांना धुरासारखे उडवून लावो— जसे अग्नी समक्ष मेण वितळते, तसे परमेश्वराच्या समक्षतेपुढून दुष्ट लोक नष्ट होवोत.

  12. परंतु नीतिमान मनुष्य हर्ष करो; परमेश्वरापुढे आनंद करो; हर्षामुळे उल्लास करो.

  13. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा, जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा; त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.

  14. परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत, ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.

  15. एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात, कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात; परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.

  16. हे परमेश्वरा, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांच्या पुढे चाललात, जेव्हा तुम्ही रानातून चाललात, सेला

  17. तेव्हा पृथ्वी थरथर कापली, परमेश्वरासमोर आकाशातून वृष्टी झाली, परमेश्वरासमोर, इस्राएलाच्या परमेश्वरासमोर सीनाय पर्वत कंपित झाला.

  18. परमेश्वरा, तुम्ही मुबलक पाऊस दिला. तुम्ही तुमचा थकलेला वारसा ताजातवाना करता.

  19. तुमची प्रजा तिथे राहिली, परमेश्वरा, तुमच्या भांडारातून तुम्ही दयाळूपणाने गरिबांना मदत केली.

  20. प्रभूने आज्ञा दिली आणि मोठ्या संख्येने महिलांनी मोठ्या आनंदाने या वार्तेचा प्रसार केला:

  21. सर्वसमर्थाने, सलमोन पर्वतावर वितळून जाणार्‍या हिमकणांसारखी राजांची पांगापांग केली.

  22. बाशान पर्वता, वैभवी बाशान पर्वता, अनेक शिखरांच्या रांगा असलेल्या पर्वता, बाशान पर्वता,

  23. आपल्या सर्वकाळच्या निवासासाठी परमेश्वराने ज्याची निवड केली, त्या सीयोन पर्वताकडे तू हेव्याने का पाहतोस? याहवेहनी ते निवास करण्यासाठी निवडले.

  24. परमेश्वराचे रथ दहा दहा हजार आणि हजारो हजार आहेत; प्रभू सीनाय पर्वतावरून पवित्रस्थानी आले आहेत.

  25. जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता, तुम्ही अनेक बंदिवान नेले; मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता; अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा— जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.