God
God चा उल्लेख असलेली वचने
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत. हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.
तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता, म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील.
आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली, तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली.
तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य! आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ.
तुमच्या अद्भुत आणि नीतिकार्याद्वारे तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देता, परमेश्वर, आमचे तारणकर्ता, पृथ्वीच्या टोकापर्यंत आणि दुर्गम समुद्रापर्यंत, तुम्ही सर्व भक्तांची आशा आहात.
आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे.
संपूर्ण पृथ्वी तुमच्या महाकृत्याने विस्मित होते; सूर्योदय आणि सूर्यास्त ही आनंदाने जयघोष करीत आहेत.
तुम्ही या भूमीची काळजी घेता व ती सिंचनासाठी देता. आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत, कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे.
तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता; पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता.
तुम्ही तुमच्या औदार्यासह वर्षास शिरोभूषण चढविता आणि तुमच्या गाड्या समृद्धीने ओसांडत आहेत.
संगीत दिग्दर्शकासाठी. एक गीत. एक स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा!
त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.
परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत! तुमच्या सामर्थ्यामुळे तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.
पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील; ते तुमच्या गौरवांची गीते गातील, ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील.” सेला
या आणि पाहा, परमेश्वराने काय केले, त्यांनी लोकांच्या बाबतीत किती अद्भुत कृत्ये केली!
त्यांनी समुद्रात त्यांच्यासाठी कोरडी भूमी तयार केली; ते जलातून पायी पलीकडे गेले— यास्तव त्यांच्यामध्ये आपण हर्ष करू या.
आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात, प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात— की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. सेला
अहो सर्व लोकहो. परमेश्वराची स्तुती करा, त्यांची स्तुतिस्तोत्रे ऐकू येवो.
हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली; चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे.
तुम्ही आम्हाला कारागृहात आणले आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली.
तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.
मी तुमच्या मंदिरात होमार्पणे घेऊन, माझे नवस फेडण्यासाठी येणार आहे—
अहो तुम्ही, जे परमेश्वराचे भय बाळगता, ते या आणि ऐका; त्यांनी माझ्यासाठी काय काय केले ते सर्व मी तुम्हाला सांगेन.
साहाय्यासाठी मी मुखाने त्यांचा धावा केला; आणि माझ्या जिभेवर त्यांची स्तुती होती.
मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती, तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता;