God
God चा उल्लेख असलेली वचने
हे परमेश्वरा, त्यांचे विषाचे दात पाडून टाका; याहवेह, या सिंहांच्या दाढा उपटून काढा.
काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी— ते हिरवे असो वा वाळलेले—दुष्टही लगेच नाहीसे होतील.
तेव्हा लोक म्हणतील, “नीतिमानाला आताही निश्चितच प्रतिफळ मिळते; आणि खचित पृथ्वीवर यथार्थपणे न्याय करणारे परमेश्वर आहेत.”
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली. हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.
पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.
याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा. या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना दयामाया दाखवू नका. सेला
याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता; तुम्ही सर्व राष्ट्रांचा उपहास करता.
तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.
तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात. परमेश्वर माझ्यापुढे जातील, मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.
परंतु त्यांना जिवे मारू नका, माझे लोक लवकर विसरतील, प्रभू, तुम्ही आमची ढाल आहात. आपल्या बलाने त्यांना मुळासकट उपटा आणि त्यांना खाली पाडा.
त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा, त्यांना असे भस्म करा, की त्यांच्यातील काहीही शिल्लक राहणार नाही. तेव्हा दिगंतापर्यंत कळेल की परमेश्वर खरोखरच याकोबाचे सत्ताधारी आहेत. सेला
परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य आणि तुमची दया यांची गीते गाईन, कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.
हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे, कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा, तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.
संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!
तुम्ही भूमी कंपित केली आहे आणि तुम्ही तिला दुभंगले आहे; आता तुम्हीच तिला नीटनेटके करा, कारण ती सर्वस्वी हादरली आहे.
तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात; तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.
परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला
आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.
परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”
परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?
परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.
कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान, शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.