मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या जिवलग मित्रांना माझ्यापासून दूर करून, त्यांना माझा वीट येईल, असे तुम्ही केले आहे. मी कोंडलेला असून त्यातून बाहेर पडू शकत नाही.

  2. वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत. याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो; हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.

  3. कारण कबरेत गेलेल्यांमध्ये तुम्ही चमत्कार करणार काय? जे मेलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय. सेला

  4. तुमच्या प्रेमाची घोषणा कबरेत जाहीर होणार काय? तुमची विश्वसनीयता विनाशात कशी प्रदर्शित होणार?

  5. अंधकारमय स्थान तुमची अद्भुत कृत्ये घोषित करेल काय? अथवा विस्मरणाच्या भूमीत तुमच्या नीतिमत्तेची साक्ष देता येईल काय?

  6. परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो; माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.

  7. हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला, आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?

  8. तारुण्यापासून मी दुःखी आणि मरणोन्मुख आहे; तुमच्या भीतीने ग्रस्त होऊन मी असहाय झालो आहे.

  9. तुमच्या क्रोधाने मला ग्रासले आहे. तुमच्या भीतीने माझा विध्वंस झाला आहे.

  10. माझे प्रियजन आणि शेजाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून दूर केले— अंधारच आता माझा घनिष्ठ मित्र झाला आहे.

  11. एज्रावंशातील एथानचा एक मासकील मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन; पिढ्यान् पिढ्या मी तुमच्या विश्वसनीयतेची माझ्या मुखाने साक्ष देईन.

  12. मी जाहीर करेन की, तुमची प्रीती आणि तुमची दया सर्वकाळ टिकणारी आहेत; तुमचे सत्य स्वर्गामध्ये तुम्ही स्थिर केले आहे.

  13. तुम्ही म्हणालात, “माझा निवडलेला सेवक, दावीद, याच्याशी मी एक करार केला आहे; मी शपथ वाहिली आहे की,

  14. ‘दावीदाच्या सिंहासनावर त्याचे वंशज अनंतकाळ राज्य करतील आणि पिढ्यान् पिढ्या विराजमान होतील.’ ” सेला

  15. याहवेह, सारे गगनमंडळ तुमच्या अद्भुत चमत्कारांची स्तुती करीत आहे. भक्तांच्या सभेत तुमच्या विश्वसनीय पावित्र्याचेही गुणगान केले जाते.

  16. कारण याहवेहशी तुलना करता येईल असा स्वर्गात कोण आहे? दिव्यदूतांच्या मंडळात परमेश्वरासमान कोण आहे?

  17. सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.

  18. हे याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, तुमच्यासारखे समर्थ परमेश्वर दुसरे कोणी आहे का? विश्वासूपणाचे वलय तुमच्याभोवती आहे.

  19. भयानक उसळणार्‍या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता; लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता.

  20. तुम्ही रहाबास असे जमीनदोस्त केले जसे एखादे शव; तुमच्या शक्तिशाली बाहूने तुम्ही शत्रूंची दाणादाण केली.

  21. स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे; कारण तुम्हीच ते आणि त्यामधील सगळे काही प्रस्थापित केले आहे.

  22. उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या; ताबोर व हर्मोन पर्वत तुमच्या नामाचा आनंदाने गजर करतात.

  23. तुमचे बाहू प्रबळ आहेत; तुमचा हात बळकट आहे, उंचावलेला आहे तुमचा उजवा हात.

  24. तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे; करुणामय प्रीती व विश्वसनीयता सतत तुमच्यापुढे चालतात.

  25. याहवेह, तुमचा गौरव करण्याचे जे शिकले, आणि जे तुमच्या प्रकाशाच्या सानिध्यात चालतात, ते धन्य होत.