मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्या नामाची प्रशंसा ते दिवसभर आनंदाने करतात; आणि तुमच्या नीतिमत्तेचा उत्सव साजरा करतात.

  2. तुम्हीच त्यांचे गौरव व सामर्थ्य आहात; तुमच्या कृपेद्वारे आमचे शिंग उच्च केले जाईल.

  3. खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत, आणि आमचा राजादेखील इस्राएलचे पवित्र परमेश्वरच आहेत.

  4. एकदा एका दृष्टान्ताद्वारे तुम्ही आपल्या भक्तांशी बोललात: “एका वीर योद्ध्याला मी सामर्थ्याने परिपूर्ण केले आहे; मी सामान्य लोकातून एक तरुण निवडला आहे;

  5. तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.

  6. माझे बाहू त्याला स्थिर करतील; निश्चितच माझे हात त्याला बळकट करतील.

  7. मी त्याच्या शत्रूंना त्याच्यासमोर चिरडेन आणि त्याच्या विरोधकांना नष्ट करेन.

  8. माझी सत्यता व करुणा त्याजबरोबर राहील; माझ्या नावानेच त्याचे शिंग उंचाविले जाईल.

  9. मी त्याला समुद्रावर अधिकार देईन, त्याचा उजवा हात नद्यांवर सत्ता गाजवेल.

  10. तो माझा धावा करून म्हणेल, ‘तुम्ही माझे पिता आहात; तुम्ही माझे परमेश्वर, माझ्या तारणाचा खडक आहात.’

  11. मी त्याची माझा ज्येष्ठपुत्र म्हणून नेमणूक करेन, आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ राजा करेन.

  12. माझ्या करुणामय प्रीतीची छाया त्याजवर सदासर्वकाळ राहील; मी त्याच्याशी केलेल्या कराराचा कधीही अंत होणार नाही.

  13. मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन, त्याचे सिंहासन गगनमंडळाच्या अस्तित्वापर्यंत राहील.

  14. “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,

  15. माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले,

  16. मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्‍यांची शिक्षा करेन.

  17. पण मी माझी प्रेममयदया त्याच्यापासून कधीही काढून घेणार नाही व माझी सत्यता मी त्यागणार नाही.

  18. मी माझा करार मोडणार नाही; मी जे बोललो त्यातील एक शब्दही बदलणार नाही.

  19. सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—

  20. दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल आणि त्याचे सिंहासन माझ्यासमोर सूर्यासमान काळाच्या अंतापर्यंत राहील.

  21. मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात.

  22. तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे.

  23. त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे.

  24. तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे.

  25. त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. सेला