मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.

  2. दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन, आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.”

  3. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  4. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

  5. हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.

  6. हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!

  7. परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!

  8. हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.

  9. परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.

  10. जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.

  11. ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”

  12. याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.

  13. तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे; तुम्ही अनंतकाळापासून आहात.

  14. याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.

  15. सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.

  16. हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे.

  17. याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत, हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा.

  18. पृथ्वीच्या न्यायाधीशा उठा; गर्विष्ठांचा यथार्थ सूड घ्या.

  19. याहवेह, कुठवर दुष्कर्मी, हे दुष्ट कुठवर जयोत्सव करणार?

  20. हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात; तुमच्या वारसांना ते छळतात.

  21. ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”

  22. ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय? ज्यांनी डोळे घडविले त्यांना दृष्टी नाही काय?

  23. जे राष्ट्रांना शिस्त लावतात, ते शिक्षा करणार नाहीत काय? जे मानवाला शिक्षण देतात, त्यांना ज्ञानाची कमतरता असेल काय?

  24. याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात; ते निरर्थक असतात हे त्यांना ठाऊक आहे.

  25. याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता, ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे;