God
God चा उल्लेख असलेली वचने
जोपर्यंत दुष्टासाठी खाच खोदली जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला विपत्तीपासून विसावा देता.
याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत; त्यांच्या वारसांना ते कधीही टाकणार नाहीत.
याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.
“हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.
जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले, तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले.
भ्रष्ट सिंहासन तुमच्याशी संघटित होईल काय— जे अन्यायी कायदे लागू करून दुर्दशा करतात?
परंतु याहवेह माझा दुर्ग झाले आहेत, आणि तेच माझे परमेश्वर, माझ्या आश्रयाचे खडक.
तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील, आणि त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांचा नाश करतील; याहवेह आमचे परमेश्वर त्यांचा नायनाट करतील.
या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या; आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.
कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.
कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत; समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.
पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.
समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले, आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.
या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या, आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;
कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!
माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’
मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.
याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.
इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे.
राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि महिमा असतो.
अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.