God
God चा उल्लेख असलेली वचने
आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा, व त्यांच्या चरणी आराधना करा; याहवेह पवित्र आहेत.
मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.
ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले; त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.
याहवेह, आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांना उत्तर दिले; त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली, तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.
आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.
एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
दावीदाची रचना. एक स्तोत्र. हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्हेने करेन.
दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.
संकटसमयीच्या आक्रांत पुरुषाची अभ्यर्थना. तो अत्यंत उदास आहे आणि याहवेहच्या समोर स्वतःच्या हृदय-वेदनेचे वर्णन करीत आहे. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.
मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.
तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात; कारण संतापाने तुम्ही मला उचलून फेकून दिले.
परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.
यातील प्रत्येक धोंड्यावर तुमचे सेवक प्रीती करतात; येथील धूळ देखील त्यांचे मन द्रवित करते.
सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील, पृथ्वीवरील सर्व राजे तुमच्या गौरवासमोर नतमस्तक होतील.
कारण याहवेह सीयोनाची पुनर्बांधणी करतील; आणि त्यांच्या गौरवाने प्रगट होतील.
भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो, जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील:
“याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली, त्यांनी स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले,
म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील आणि यरुशलेमात त्यांची स्तुती करतील.
जेव्हा लोक व राष्ट्रेही याहवेहची उपासना करण्यासाठी तिथे येतील.
माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले; त्यांनी माझे आयुष्य कमी केले.