God
God चा उल्लेख असलेली वचने
परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले;
ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्याखोर्यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.
ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते.
ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात, आणि मानवाने मशागत करावी— जमिनीतून अन्न उत्पादन करावे म्हणून:
याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.
सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.
हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.
यात जहाजांचे दळणवळण होत असते, आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला.
निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो.
जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता, तेव्हा ते गोळा करतात; तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात.
परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता, तेव्हा ते व्याकूळ होतात; जेव्हा तुम्ही त्यांचा श्वास काढून घेता, तेव्हा ते मरतात व पुन्हा मातीत जाऊन मिसळतात.
मग तुम्ही आपला आत्मा पाठविता, तेव्हा ते अस्तित्वात येतात, आणि पृथ्वीला पुन्हा नवे स्वरूप आणता.
याहवेहचे वैभव सर्वकाळ राहो; याहवेहला आपल्या कृतीपासून आनंद होवो—
त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते; ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात.
मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन.
माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.
सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत; दुष्ट परत न दिसोत. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. याहवेहचे स्तवन कर!
याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.
त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.
त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.
याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.
परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.
अहो त्यांचे सेवक, अब्राहामाच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, स्मरण करा.
कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
जी अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती, ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात.