मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ओसाड भूमीत त्यांनी आपल्या उत्कट इच्छांना मोकळी वाट करून दिली; वाळवंटात परमेश्वराची परीक्षा पाहिली.

  2. परमेश्वराने त्यांच्या मागण्या पुरविल्या, परंतु जीव झुरणीस लावणारा रोगही त्यांच्याकडे पाठविला.

  3. तंबूत असताना मोशे आणि याहवेहचा अभिषिक्त अहरोन यांच्या विरुद्धही त्यांचा हेवा वाढला.

  4. त्या परमेश्वराला ते विसरले, ज्यांनी त्यांना सोडविले, इजिप्त देशात महान चमत्कार केले,

  5. मग ते म्हणाले की ते त्यांचा नाश करतील— जर खुद्द त्यांनी निवडलेला पुरुष मोशे, मध्ये उभा राहिला नसता तर, त्यांनी आपला क्रोध न आवरता त्या लोकांचा नाश केला असता.

  6. वचनदत्त देशास त्या लोकांनी तुच्छ लेखले; त्यांनी दिलेल्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास नव्हता.

  7. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, आणि याहवेहची आज्ञा झिडकारली.

  8. तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली, की या रानात ते त्यांना नष्ट करतील.

  9. या सर्व दुष्टकर्मांनी त्यांनी याहवेहला क्रुद्ध केले, म्हणून त्यांच्यामध्ये मरी पसरली.

  10. मरीबाह जलाशयाजवळ देखील त्यांनी याहवेहला राग आणला, आणि त्यांच्यामुळेच मोशेवर संकट आले;

  11. याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही, त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही.

  12. आणि म्हणून याहवेहचा क्रोध आपल्या लोकांविरुद्ध भडकला आणि त्यांना त्यांच्या वारसांची घृणा आली.

  13. त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले, त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले.

  14. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.

  15. असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला;

  16. त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.

  17. हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्हाला मुक्त करा; आम्हाला राष्ट्रांतून एकवटून घ्या, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.

  18. इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. सर्व लोकांनी म्हणावे “आमेन!” याहवेहची स्तुती होवो.

  19. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे.

  20. याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे— ज्यांची त्यांनी शत्रूपासून सुटका केली आहे,

  21. त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.

  22. त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले, आणि वस्ती करण्यास नगरात आणले.

  23. याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.

  24. कारण ते तहानेल्यास तृप्त करतात, आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात.

  25. कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले.