मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.

  2. संगीत दिग्दर्शकाकरिता. दावीदाची रचना. एक स्तोत्र. हे माझ्या स्तुतिपात्र परमेश्वरा, तुम्ही मौन धारण करू नका,

  3. त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा; आरोप लावणारा त्याच्या उजव्या हातास उभा ठेवा.

  4. त्याच्या आईवडिलांच्या अपराधांबद्दल याहवेह त्याला शासन करो; त्याच्या मातेची पातके कधीही पुसली न जावो.

  5. त्याने केलेल्या दुष्ट कृत्यांची याहवेह सतत आठवण ठेवो, व पृथ्वीवरून त्याचे नाव ते कायमचे पुसून टाकोत.

  6. जे माझे शत्रू माझ्याविषयी खोट्या गोष्टी उठवितात, त्यांना माझे याहवेह परमेश्वर हाच मोबदला देवो.

  7. तरी हे सार्वभौम याहवेह, तुमच्या नावासाठी माझ्यावर कृपा करा; आपल्या करुणामय प्रीती अनुरूप माझी सुटका करा.

  8. हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुमच्या अक्षय प्रीतिनुरुप माझे तारण करा.

  9. हे याहवेह, सर्वांना कळावे की जे काही होत आहे, ते सर्वकाही तुमच्याच हातांनी केले आहे.

  10. त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा; जे माझ्यावर हल्ला करतात, ते लज्जित होवोत, पण मी, तुमचा सेवक मात्र हर्षभरित होवो.

  11. परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन, उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन.

  12. कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात, त्यांना मृत्युदंड देणार्‍यापासून ते त्यांना संरक्षण देतात.

  13. दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”

  14. याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील, “तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!”

  15. तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील.

  16. याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”

  17. तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे; आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील.

  18. याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.

  19. याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.

  20. गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.

  21. याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे; ते कृपाळू व दयाळू आहेत.

  22. जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात; ते आपला करार नेहमी स्मरणात ठेवतात.

  23. त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास, त्यांनी अन्य राष्ट्रांची भूमी त्यांना वतनादाखल दिली.

  24. त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.

  25. त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे; त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे— त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे.