मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,

  2. “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.”

  3. याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:

  4. “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”

  5. त्यांनी त्यांच्या देशावर दुष्काळ आणला, आणि त्यांचा अन्नपुरवठा तोडून टाकला.

  6. याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत, त्यांनी दिलेले अभिवचन पूर्णपणे पारखले जाईपर्यंत हे घडले.

  7. याहवेहने इस्राएली लोकांना अत्यंत समृद्ध केले; त्यांच्या शत्रूपेक्षाही त्यांची लोकसंख्या अधिक झाली,

  8. त्यांच्या सेवकांविरुध्द कट करण्यासाठी परमेश्वराने इजिप्ती लोकांचे मन फिरविले.

  9. तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला व अहरोनाला निवडून पाठवले.

  10. त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले, हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली.

  11. परमेश्वराने अंधकार पाठवून त्या संपूर्ण देशाला अंधकारमय केले— कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाची अवहेलना केली नाही का?

  12. त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले; त्यांना स्वर्गातील भाकर देऊन तृप्त केले.

  13. कारण आपला सेवक अब्राहाम याला दिलेल्या पवित्र अभिवचनाची त्यांना आठवण होती.

  14. त्यांनी त्यांच्या लोकांना आनंदाची गाणी गात, व आपल्या निवडलेल्यांना हर्षनाद करीत बाहेर आणले;

  15. जेणेकरून इस्राएली लोक त्यांचे विधिनियम व त्यांची आज्ञा दक्षतेने पाळतील. याहवेहची स्तुती असो.

  16. याहवेहची स्तुती असो! याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  17. याहवेहची सर्व गौरवशाली कृत्ये, किंवा त्यांची स्तुती पूर्णपणे कोण जाहीर करेल?

  18. हे याहवेह, जेव्हा तुमच्या प्रजेवर कृपादृष्टी कराल, तेव्हा माझेही स्मरण करा, त्यांचे तारण कराल, तेव्हा मलाही मदत करा.

  19. म्हणजे तुम्ही निवडलेल्यांच्या समृद्धीत मलाही वाटा मिळेल, आणि तुमच्या राष्ट्रांच्या सर्व आनंदामध्ये मीही सहभागी होईन, आणि तुमच्या वारसांसह मी देखील तुमचे स्तुतिगान करेन.

  20. जेव्हा ते इजिप्तमध्ये होते, तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही; तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले; उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले.

  21. तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.

  22. तांबड्या समुद्राला दरडावताच तो कोरडा झाला; वाळवंटातून चालत असल्यासारखे त्यांना खोल समुद्रातून चालविले.

  23. त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले; शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली.

  24. तेव्हा लोकांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला, व त्यांचे स्तुतिगान केले.

  25. परंतु त्यांनी केलेले कार्य ते लवकर विसरले, त्यांनी केलेली योजना पूर्ण होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही.