मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण मी त्यांना आरोळी मारली: “हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका; तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात.

  2. प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.

  3. ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी, तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल.

  4. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.

  5. तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील; तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.”

  6. दावीदाची रचना माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.

  7. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको.

  8. ज्यांच्यावर जुलूम केला गेला, त्या सर्वांना याहवेह धार्मिकतेने व न्यायाने वागवितात.

  9. त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले, आणि आपली अद्भुत कृत्ये इस्राएली लोकात केली:

  10. याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.

  11. ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.

  12. कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्‍यांवर विपुल आहे.

  13. पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे, तेवढे त्यांनी आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.

  14. जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्‍यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.

  15. कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे.

  16. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.

  17. जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.

  18. याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे, आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे.

  19. अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.

  20. अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो, त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.

  21. त्यांच्या अधिपत्त्यातील अखिल रचनांनो, याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.

  22. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.

  23. तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,

  24. आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्‍याच्या पंखावर आरूढ होऊन जातात.

  25. ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.