मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या.

  2. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!

  3. राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.” सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील.

  4. सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.

  5. याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो; दूर असलेले तटवर्ती क्षेत्रही हर्ष करोत.

  6. मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत; धार्मिकता आणि न्याय त्यांच्या राजासनाचा पाया आहे.

  7. अग्नी त्यांच्यापुढे चालतो, आणि त्यांच्या शत्रूंना तो सर्व बाजूने भस्म करतो.

  8. याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात.

  9. आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते; संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते.

  10. जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!

  11. सीयोन ऐकते व उल्हासित होते, याहवेह, तुमच्या निर्णयामुळे, यहूदीयातील गावे हर्षभरित होतात.

  12. कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात; सर्व दैवतांहून तुम्ही अत्यंत थोर आहात.

  13. याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत, कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.

  14. सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.

  15. एक स्तोत्र. याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा, कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे; त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी तारण मिळविण्याचे कार्य केले आहे.

  16. याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे, आणि राष्ट्रांसमक्ष आपली नीतिमत्ता प्रकाशित केली आहे.

  17. इस्राएलवरील त्यांची प्रीती आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.

  18. अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;

  19. वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,

  20. शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.

  21. ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.

  22. याहवेह राज्य करतात, राष्ट्रे थरथर कापोत; ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत; सर्व पृथ्वी कंपित होवो.

  23. अतिमहान होत सीयोनातील याहवेह; ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.

  24. राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.

  25. राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.