मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, असे कुठवर चालणार? तुम्ही स्वतःला सर्वकाळ लपवून ठेवणार काय? कुठवर तुमचा क्रोधाग्नी भडकत राहणार?

  2. माझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे स्मरण करा. तुम्ही मानवाला किती व्यर्थ जीवन जगण्यासाठी निर्माण केले!

  3. हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली?

  4. हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू!

  5. याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले.

  6. याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो!

  7. परमेश्वराचे प्रिय पात्र, मोशेची एक प्रार्थना हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या तुम्ही आमचे वसतिस्थान आहात.

  8. पर्वत निर्माण होण्यापूर्वी, सृष्टीची घडण होण्यापूर्वी, अनादि ते अंतापर्यंत तुम्हीच परमेश्वर आहात!

  9. हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत, जसा कालचा गेलेला एक दिवस, किंवा रात्रीचा एक प्रहर.

  10. तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो; तुमच्या संतापाने आम्ही दडपून जातो.

  11. तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता; तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.

  12. तुमच्या क्रोधाच्या छायेखाली आम्ही आमचे जीवन जगतो; कण्हत आमची वर्षे सरतात.

  13. तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते! तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती.

  14. हे याहवेह, तुमच्या मनाला पाझर फुटू द्या, आणखी किती विलंब लागणार? आपल्या सेवकांवर दया करा.

  15. सकाळच्या समयी तुमच्या अक्षयप्रीतीने आम्हाला तृप्त करा, म्हणजे आम्ही आनंदात राहू व आमचे सर्व दिवस हर्षभरित होतील.

  16. तुम्ही जितके दिवस हालअपेष्टा भोगावयास लावले, तितके दिवस हर्षभरित करा, त्या वर्षांच्या प्रमाणात आता आम्हाला आनंद द्या.

  17. तुमची गौरवशाली कृत्ये तुमच्या सेवकांना दिसो, तुमचे वैभव त्यांची मुलेबाळे बघोत.

  18. आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा आम्हावर होवो; आणि आमची सर्व कार्ये सुस्थिर होवोत— होय, आमच्या हाताच्या कार्यास सुस्थिरता येवो.

  19. जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.

  20. मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.”

  21. कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील.

  22. ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.

  23. जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,” आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस,

  24. कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.

  25. याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन, त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे.